लघुप्रकल्पांमध्ये १९ तर मध्यमप्रकल्पांत ३३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:08 IST2019-05-08T12:07:38+5:302019-05-08T12:08:02+5:30

दुष्काळझळा : जिल्ह्यातील ३७ प्रकल्पांची स्थिती दयनीय

19 per cent in mini-projects and 33 per cent in medium-scale projects | लघुप्रकल्पांमध्ये १९ तर मध्यमप्रकल्पांत ३३ टक्के साठा

लघुप्रकल्पांमध्ये १९ तर मध्यमप्रकल्पांत ३३ टक्के साठा

नंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळझळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़ यातच पाणीसाठ्यातही घट होत असून विविध भागातील ३७ लघुप्रकल्पात १९ तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ तुरळक अशा या साठ्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याचे दिसून आले आहे़
नवापूर तालुक्यात ११, नंदुरबार ११, शहादा ७, अक्कलकुवा आणि धडगाव प्रत्येकी १ तर तळोदा तालुक्यात पाच असे ३७ लघुप्रकल्प आहेत़ एकूण ९५़०३ दशलक्ष घनमीटर साठ्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पांमध्ये आजअखेरीस केवळ ८८़५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे़ यातील ६़५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा मृत असल्याने केवळ ८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वापरायोग्य आहे़ एकत्रितपणे जलसाठा संख्येच्यादृष्टीने मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी पाणी आटल्याचे दिसून आले आहे़ नवापूर तालुक्यातील सर्व ११ लघुप्रकल्पच यंदा पूर्ण क्षमतेने भरले असल्याची स्थिती आहे़ उर्वरित पाच तालुक्यातील २६ प्रकल्पांमध्ये १ ते दीड दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक आहे़
लघुप्रकल्पांची स्थिती कमकुवत होत असताना मध्यप्रकल्पांची स्थिती गंभीर आहे़ रंगावली प्रकल्पात ३२, प्रकाशा बॅरेज ४०, सारंगखेडा बॅरेज ३६, शिवण २३ तर शहादा तालुक्यातील दरा मध्यमप्रकल्पात ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ एकूण १० हजार २२२ दशलक्ष घनफूट असलेले हे पाणी कालवे आणि उपसा सिंचन योजनेअभावी निरुपयोगी ठरत आहेत़ शिल्लक असलेला साठा मे महिन्यातही पुरेसा ठरणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे़ लघु आणि मध्यम प्रकल्पाच्या बळावर पाणीयोजना आणि शेतीचे सिंचन होत असल्याने पाण्याअभावी त्यांची स्थिती बिकट होणार आहे़

Web Title: 19 per cent in mini-projects and 33 per cent in medium-scale projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.