शहादा उपविभागात 189 मंडळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:58 IST2019-09-05T14:58:40+5:302019-09-05T14:58:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा शहर व ग्रामीणसह धडगाव परिसरात गणपती बाप्पा मोरया च्या जयजयकार करत गणेश मंडळांनी ...

189 boards participated in Shahada subdivision | शहादा उपविभागात 189 मंडळांचा सहभाग

शहादा उपविभागात 189 मंडळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा शहर व ग्रामीणसह धडगाव परिसरात गणपती बाप्पा मोरया च्या जयजयकार करत गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची विधिवत स्थापना केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळ व एक गाव एक गणपती मिळून सुमारे 189 गणेश मंडळाची ऑनलाइन नोंद झाली असल्याची माहिती शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची उत्साहपूर्णवातावरणात स्थापना केली. गेल्या महिनाभरापासून कार्यकर्ते उत्साहाने ‘श्रीं’च्या आगमनाची वाट पाहत होते. स्टेज, आरास व विद्युतरोषणाईच्या कामात पदाधिकारी मग्न होते. एक दो तीन चार गणपतीचा जयजयकारच्या गजरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. शहादा शहरात चार टप्प्यात ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणुकीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. शहरात एकूण 45 सार्वजनिक तर तीन खाजगी गणेश मंडळ व ग्रामीण भागातील 20 गणेश मंडळांची नोंद झालेली आहे. पहिल्या टप्प्यातील पाचव्या दिवशी शहरात आठ, ग्रामीण भागात नऊ तर दुस:या टप्प्यात सातव्या दिवशी शहरातील बारा, ग्रामीण भागात पाच मंडळांतर्फे विसजर्न मिरवणूक काढण्यात येणार आहे. तिस:या टप्प्यात नवव्या दिवशी शहरातील 12, ग्रामीण भागात दोन व अनंत चतुर्थीच्या दिवशी शहरातील तेरा सार्वजनिक गणेश मंडळ तर ग्रामीण भागातून चार सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. 
शहादा येथे एकूण 54 गणेश मंडळ आहेत. ग्रामीण भागात सार्वजनिक 23 व एक गाव एक गणपतींतर्गत तीन असे एकूण 80 मंडळांनी नोंद केलेली आहे. धडगाव येथे शहरीभागात आठ तर ग्रामीण भागात सार्वजनिक सहा व एक गाव एक गणपतींतर्गत 20 मंडळाची नोंद करण्यात आली आहे. सारंखेडा पोलीस ठाण्यांतर्गत गावात सार्वजनिक गणेश मंडळ ग्रामीण भागात 20, एक गाव एक गणपतींतर्गत चार असे एकूण 32 गणेश मंडळ आहेत. म्हसावद पोलीस ठाण्यांतर्गत गावात दहा मंडळ तर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक 23, एक गाव एक गणपती 14 असे एकूण 57 मंडळाची नोंद आहे. शहादा, धडगाव, सारंखेडा, व म्हसावद शहरी भागात 80 मंडळ ग्रामीण भागात 109 मंडळ तर एकूण 189 मंडळाची नोंद असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी सांगितले. 
शहाद्यातील चार टप्प्याच्या श्री विसर्जन मिरवणुकी करिता धुळे येथून विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे. शहादा शहर हे शांततामय शहर आहे. श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या कार्यकत्र्यानी शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहराची शांतता कायम राहावी याकरिता एसआरपीएफ प्लाटून , पोलीस उपनिरीक्षक अधिकारी तील, होमगार्ड 112 व 53 पोलीस कर्मचा:यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. 
शहादा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी म्हटले की, गणेश उत्सव व मोहरम हा हिंदू-मुस्लिम बांधवांचा सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात यावा सन साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याचे भान प्रत्येकाने ठेवावे. सण-उत्सवा दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता शहरातील प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्ग व शांतता भंग होऊ शकतो अशा काही भागात एकूण 48 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. कॅमे:यातील प्रत्येक चित्रफित थेट जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक शहर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या संपर्कात असून, अति उत्साही कार्यकत्र्यानी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. या सोबत श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान, शहरात एकूण चार ड्रोनच्या माध्यमातून मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. 
शहरात आरस व श्री गणेश दर्शनाकरिता तिस:या दिवसापासून शहर व ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवक-युवती यांची गर्दी   होणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी, महिला पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: 189 boards participated in Shahada subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.