लोकवर्गणीतून गावातील 185 कुटुंबांना वाटले हेल्मेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:13 IST2019-07-21T12:13:14+5:302019-07-21T12:13:19+5:30

परिवर्धे : शासनाने हेल्मेटची सक्ती कितीही केली तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. जोर्पयत वाहन चालकांची स्वत: हून मानसिकता ...

185 families in the village felt helmets | लोकवर्गणीतून गावातील 185 कुटुंबांना वाटले हेल्मेट

लोकवर्गणीतून गावातील 185 कुटुंबांना वाटले हेल्मेट

परिवर्धे : शासनाने हेल्मेटची सक्ती कितीही केली तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. जोर्पयत वाहन चालकांची स्वत: हून मानसिकता बदलत नाही तोर्पयत त्याचा उपयोग होणार नाही. असाच काहीसा अनुभव परिवर्धे ग्रामस्थांकडून अनुभवास येतो.
शहादा तालुक्यातील परिवर्धे येथे लोकवर्गणीतून गावातील प्रत्येक दुचाकी वाहनधारकांसाठी आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेकरिता 185 हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यात 100 पुरूषांना व 85 महिलांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. दिवसेंदिवस वाहनाची वाढणारी संख्या आणि अपघातांचे प्रमाण वाढतच असल्याने परिवारातील कर्ता व्यक्तीचे अपघाती निधनाने काय परिणाम होतात हे परिवर्धे ग्रामस्थांना चांगले अनुभवास मिळाले असल्याने हेल्मेटची सक्ती ही एक मताने मंजूर करून महिला व पुरुष असे दोन्ही मिळून  510 रुपये दोन हेल्मेटप्रमाणे गोळा केले. यासाठी इंदोर येथे नोकरी व व्यवसायानिमित्ताने राहत असलेले परिवर्धे येथील व्ही.एस.जी.जी.एम. सदस्य श्रीपत विठ्ठल पाटील व विठ्ठल छगन पाटील, गुलाल नरसई पाटील यांच्या परिश्रम घेत ग्रामस्थांना घरपोच हेल्मेटचे वाटप केले.
 

Web Title: 185 families in the village felt helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.