लंडनहून नंदुरबारात आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:13 IST2020-05-12T12:13:29+5:302020-05-12T12:13:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पावले उचलली असून यांतर्गत जगातील विविध ...

An 18-year-old student from London was quarantined in Nandurbar | लंडनहून नंदुरबारात आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला केले क्वारंटाईन

लंडनहून नंदुरबारात आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला केले क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पावले उचलली असून यांतर्गत जगातील विविध देशातून भारतीयांना परत आणले जात आहे़ यात भालेर ता़ नंदुरबार येथील १८ वर्षीय विद्यार्थी सोमवारी पहाटे नंदुरबारात परत आला़ सतर्कता म्हणून त्याला क्वारंटाईन करण्यात आले असून त्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती देण्यात आली आहे़
भालेर येथील रहिवासी असलेला १८ वर्षीय युवक इंग्लडमधील कार्डिफ (लंडन) येथे शिक्षणासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये दाखल झाला होता़ शिक्षण सुरळितपणे सुरु असताना कोरोनाची साथ फोफावल्याने त्याचे पालक चिंतेत होते़ इंग्लंड मायदेशी परत येता यावे यासाठी विद्यार्थ्याने ब्रिटीश गर्व्हमेंटसोबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता़ त्याच्या पालकांनी खासदार डॉ़ हीना गावीत यांची महिनाभरापूर्वी भेट घेत मुलाला नंदुरबारमध्ये परत आणण्यासाठी विनंती केली होती़ त्यानुसार खासदार गावीत यांनी त्याचवेळी आश्वासन दिले होते़ दरम्यान केंद्र शासनाने गेल्या आठवड्यापासून बंधने शिथिल करुन परदेशात अडकलेल्यांना आणण्याची सोय करत नोंदणी सुरु केली होती़ यात खासदार डॉ़ हीना गावीत यांनी केंद्र शासन आणि इंग्लंडमधील भारतीय राजदूत यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी लंडनहून परतणाऱ्या पहिल्याच विमानाचे तिकिट विद्यार्थ्याला मिळाले होते़ रविवारी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने नंदुरबार येथे रवाना करण्यात आले़ त्याचे वडील व आणखी एक जण अशा दोघांनाच त्याला मुंबई येथून परत आणण्याची परवानगी देण्यात आली होती़ रविवारी रात्री नंदुरबार येथे आल्यानंतर त्याला होळ तर्फे शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले़ याठिकाणी वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली़ प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: An 18-year-old student from London was quarantined in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.