वीज पडून 18 वर्षीय युवती जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 11:29 IST2017-09-13T11:29:47+5:302017-09-13T11:29:47+5:30

सातपुडय़ातील घटना : बैल घेऊन जात असतानाचा प्रकार

 An 18-year-old girl was killed on the spot | वीज पडून 18 वर्षीय युवती जागीच ठार

वीज पडून 18 वर्षीय युवती जागीच ठार

ठळक मुद्देआठ वर्षीय बालिकाही जखमी पावसाला सुरूवात झाल्यानंतर घराबाहेर पडणा:या मिराकशी हिची लहान बहिण विदासी ही तिच्या मागे धावत गेली होती़ मात्र ती काही अंतर लांब असल्याने वीजेचा जोरदार धक्का बसून ती लांबवर फेकली जाऊन दुखापतग्रस्त झाली़ ही घटना घडली त्यावेळी वां


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील उडद्या येथे बैलाला गोठय़ात बांधण्यासाठी घेऊन जाणा:या 18 वर्षीय युवतीवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली़ 
सातपुडय़ाच्या दुर्गम भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आह़े रविवारी दुपारी उडद्या येथे पावसाला सुरूवात झाली़ यावेळी वांग:या मालसिंग पावरा यांची मुलगी मिराकशी पावरा ही अंगणात बांधलेला बैल सोडवण्यासाठी गेली़ बैलाला घेऊन गोठय़ाकडे जात असताना तिच्या अंगावर आकाशातून वीज कोसळली़ यात मिराकशी आणि बैल हे दोघेही जागीच ठार झाले, प्रचंड वेगाने कोसळलेल्या या वीजेमुळे घराचे प्रचंड नुकसान झाल़े घटना घडल्यानंतर मयत मिराकशी पावरा हिचे कुटूंबिय आणि गावातील नागरिक धावून आले, मात्र तोवर उशिर झाला होता़ दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती पाऊस कमी दोन दिवसांनी म्हसावद पोलीस ठाण्यात देण्यात आली आह़े पावसामुळे पोलीस ठाण्याशी संपर्क होत नसल्याने माहिती देण्यास उशिर झाला़ म्हसावद पोलीस ठाण्यात वांग:या मालसिंग पावरा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े 
घटनास्थळी जाऊन सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचा:यांनी जाऊन पाहणी केली होती़

Web Title:  An 18-year-old girl was killed on the spot