नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:55 IST2017-12-14T12:55:43+5:302017-12-14T12:55:47+5:30

नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागासह ठिकठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होऊनही दरवर्षी गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही़ एप्रिल ते डिसेंबर 2017 या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल 18 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े
महिला आणि बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुश्रुषा करण्यात येत़े यातून किमान पाच ते सहा महिने गर्भवती मातेचा आहार आणि तपासण्या करण्यात येतात़ असे असतानाही मात्र गेल्या काही वर्षात प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत़ रक्तस्त्राव होऊन व रक्तदाब कमी होऊन मातांचे मृत्यू झाले आहेत़ शासनाने गर्भवती मातांसाठी राबवण्यात येणा:या योजनांची दक्षतेने अमंलबजावणी करण्याची अपेक्षा आह़े