शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्रगठणासाठी 17 हजार शेतकरी ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहिर झाल्यानंतर विविध सवलतीही लागू झाल्या आहेत़ यात कजर्पुनर्गठनाची तरतूद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहिर झाल्यानंतर विविध सवलतीही लागू झाल्या आहेत़ यात कजर्पुनर्गठनाची तरतूद असून जिल्ह्यातील 17 हजार शेतकरी या प्रक्रियेस पात्र ठरणार आहेत़ परंतू ही सवलत मिळवून घेण्यासाठी बँकेत संमतीपत्र द्यावे लागणार असल्याने ही सवलतही शेतक:यांना मृगजळ भासू लागली आह़े जिल्ह्यातील 11 राष्ट्रीयकृत आणि धुळे व नंदुरबार जिल्हा  बँकेच्या 31 शाखांमधून यंदाच्या खरीप हंगामाकरिता 17 हजार 628 शेतक:यांना खरीप पिककर्जाचा पुरवठा करण्यात आला होता़ नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा या चार दुष्काळग्रस्त तालुक्यातील 16 हजार 900 शेतक:यांनी पीक कर्ज घेतले असल्याने त्यांना कर्ज पुर्नगठनाचा थेट लाभ मिळणार आह़े या शेतक:यांना 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात बँकांनी एकूण 289 कोटी 49 लाख रूपयांचे पिक कर्ज वितरीत केले आह़े या कर्जाची परतफेड करण्याची वर्षभराची मुदत होती़ परंतू आता शासनाने दुष्काळ जाहिर करत पुर्नगठन करण्याची सवलत जाहिर केल्याने वसुली थांबवण्यात आली आह़े  जिल्ह्यातील शेतक:यांचा सर्वाधिक भरवसा असलेल्या जिल्हा बँकेची स्थितीही यंदा कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आह़े बँकेने केवळ 51 टक्केच कर्ज वाटप केले असल्याने येत्या काळातील वसुलीवर त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे बोलले जात आह़े 31 ऑगस्टर्पयत बँक ऑफ बडोदाने 1 हजार 254 शेतक:यांना 17 कोटी 61 लाख, बँक ऑफ इंडियाने 673 शेतक:यांना 7 कोटी 33 लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने 1 हजार 313 शेतक:यांना 21 कोटी 12 लाख, कॅनरा बँकेने 45 शेतक:यांना 71 लाख, सेंट्रल बँकेने 2 हजार 29 शेतक:यांना 31 कोटी 30 लाख, देना बँकेने 568 शेतक:यांना 15 कोटी, आयडीबीआय बँकेने 910 शेतक:यांना 17 कोटी 13 लाख, पंजाब नॅशनल बँकेने 38 शेतक:यांना 38 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 हजार 411 शेतक:यांना 86 कोटी 60 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाने 1 हजार 99 शेतक:यांना 14 कोटी 90 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आह़े यंदा राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 10 हजार 340 शेतक:यांना कजर्वाटप केले आह़े प्रत्यक्षात त्यांना 55 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश होत़े खरीप हंगामात 38 टक्केच कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँका करु शकल्याने त्यांच्याकडून वसुलीची सक्ती करण्यास सुरुवात झाली आह़े त्यातुलनेत जिल्हा बँकने यंदाच्या खरीप हंगामात धडगाव आणि अक्कलकुवा तालुका वगळता 5 हजार 581 शेतक:यांना 36 कोटी 64 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आह़े जिल्ह्यात केवळ 40 टक्के कजर्वाटप बँकींग नियमानुसार 1 लाख रूपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकरी सभासदाच्या कर्जाची पाच हप्त्यात विभागणी करून पाच वर्षार्पयत दीर्घ मुदत देण्यात येऊन कर्जाचे पुर्नगठन होत़े बँकांकडून कर्ज घेणा:या 17 हजार शेतक:यांची थकबाकी येण्यास मोठा कालावधी लागणार असल्याने बँकांचे अधिकारी या निर्णयाला अनुकुल नसल्याचे दिसून आले आह़े 1 नोव्हेंबर ते 31 मार्च या काळात बँकांकडून कर्ज वसुलीला सुरवात करण्यात येत़े शासनाकडून दुष्काळ जाहिर केल्यानंतर जिल्हा बँकेने कर्ज वसुली पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांकडून काही शेतक:यांच्या खात्यांवरुन पैसे कपात करून कर्जाचे हप्ते वसुल करण्यात आल्याची माहिती आह़े ब:याच शेतक:यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर बोंडअळीचे पैसे आल्यानंतर त्याची परस्पर कपात झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या़यंदाच्या खरीप हंगामाच्या प्रारंभापासून पीक कर्ज वाटपात गोंधळ उडाला होता़ परिणामी सर्व बँका मिळून जिल्ह्यात 31 ऑगस्टअखेर्पयत सरासरी 40 टक्के कर्ज वाटप झाले आह़े 70 हजार शेतक:यांना कर्ज देणे गरजेचे असताना बँकांकडून केवळ 17 हजार 628 शेतक:यांनी पीक कर्ज घेतल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े शेतक:यांना 2015 या वर्षात कजर्पुर्नठनाची सवलत राज्यात देण्यात आल्याची माहिती आह़े त्यावेळी बँकांकडून मोठय़ा कजर्धारक शेतक:यांनाच त्याचा लाभ देण्यात आला होता़ यातून कर्जाचे हप्ते लांबून व्याजदर वाढत असल्याने कर्ज पुर्नगठनास शेतक:यांनी नकार दिला होता़ या पाश्र्वभूमीवर यंदा शेतक:यांकडून संमतीपत्र घेण्याचा निर्णय सहकार विभागाकडून घेण्यात आल्याची माहिती आह़े शेतक:यांनी घेतलेल्या अल्पमुदत कर्जाचे दीर्घमुदतीत रुपांतर होण्याची प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागणार असल्याने कर्जावरील व्याजाचा दर 1 ते 4 टक्के वाढून शेतक:यांवर बोजा पडणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े राष्ट्रीयकृत बँकांकडून या पुर्नगठन प्रक्रियेसाठी मोठय़ा कजर्धारक शेतक:यांची निवड करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने छोटय़ा शेतक:यांना पुर्नगठनाच्या सवलतीपासून दूर रहावे लागण्याची चिन्हे आहेत़   एकीकडे दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना दुसरीकडे पीककर्जाची वसुली प्रक्रिया टाळून मुदत वाढवून घेण्यासाठी शेतक:यांनाच फिरावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े