१७ शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पेन्शनचे धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:34+5:302021-05-31T04:22:34+5:30
प्राथमिक शिक्षकांचे २५ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून शिक्षण विभागास प्राप्त झाले होते. त्यापैकी १७ प्रस्ताव मंजूर करून प्राथमिक शिक्षण ...

१७ शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पेन्शनचे धनादेश
प्राथमिक शिक्षकांचे २५ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून शिक्षण विभागास प्राप्त झाले होते. त्यापैकी १७ प्रस्ताव मंजूर करून प्राथमिक शिक्षण विभागाने ३१ मे रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख यांना सेवानिवृत्तच्या आधीच ३१ मेपूर्वी त्यांचे अंशराशीकरण व उपदानाच्या रकमा पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना १ जून रोजी प्रत्येक पंचायत समिती स्तरावर या रकमा प्राप्त होऊ शकतील.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, लेखा व वित्त अधिकारी गायकवाड, देवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी त्यासाठी सूचना दिल्या.
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी,उपशिक्षणाधिकारी बी. एम. रोकडे, डॉ. युनूस पठाण यांनी पेन्शन प्रस्तावाचा पाठपुरावा केला. याबद्दल अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य संघाचे सल्लागार सुरेश भावसार, राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, जिल्हा सरचिटणीस अशोक देसले यांच्यासह पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केेले.