कोंडाईबारी घाटात अपघातात 16 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 21:38 IST2019-10-06T21:38:12+5:302019-10-06T21:38:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दग्र्याजवळील पुलाजवळील रिक्षा, ट्रक, कार आणि मोटारसायकल ...

कोंडाईबारी घाटात अपघातात 16 जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दग्र्याजवळील पुलाजवळील रिक्षा, ट्रक, कार आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील 16 मजूर जखमी झाल्याची घटना घडली़ रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़
उचीशेवडी ता़ येथील मजूर दहिवेल ता़ साक्री मजूरीसाठी गेले होत़े रविवारी सायंकाळी एमएच 41 सी 8716 या रिक्षाने ते परत येत असताना कोंडाईबारी घाटात पुलाजवळ मागून आलेल्या ट्रकने रिक्षाला धडक जोरदार धडक दिली़ धडकेमुळे हवेत उडालेली रिक्षा पुढे चालणा:या मोटारसायकलवर जाऊन आदळत उलटली़ दरम्यान समोरुन येणा:या एमएच 18 डब्ल्यू 8515 या चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिली़ धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटली़ रिक्षाची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार अरुण तोरवणे हे गंभीर जखमी झाल़े तर रिक्षातील निलेश मधुकर गावीत, जैना दिलीप गावीत, जेज:या कोमा गावीत, लिलाबाई आसु गावीत, मिनाबाई दशरथ गावीत, आनंदी हिराजी गावीत, सुनील जयद्या गावीत, हिरुबाई सतीश गावीत, सुनिता निलेश गावीत, नितेश राजेश गावीत, विजय सुरेश वसावे, रविता गणेश गावीत, गीता राजेश गावीत, जयसिंग भरत गावीत, रंजना किसन गावीत सर्व रा़ उचीशेवडी हे जखमी झाला़
जखमींना प्रारंभी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल वसावे यांनी जखमींवर उपचार केल़े घटनेतील गंभीर जखमी दुचाकीस्वार अरुण तोरवणे, निलेश गावीत यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आह़े तर जैना गावीत व सुनिता गावीत या दोघी महिलांना चिंचपाडा येथील रुग्णालात दाखल करण्यात आले आह़े उर्वरित जखमींवर विसरवाडी येथे उपचार सुरु आहेत़ विसरवाडी पोलीसांकडून रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होत़े