तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलीस पाटलांच्या 150 जागा रिक्त
By Admin | Updated: July 17, 2017 17:54 IST2017-07-17T17:54:23+5:302017-07-17T17:54:23+5:30
रिक्त जागामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलीस पाटलांच्या 150 जागा रिक्त
ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.17- तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलीस पाटलांच्या 150 जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत़ अशा गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी जिल्हा पोलीस पाटील संघाने केली आह़े
या प्रकरणी संघटनेच्या पदाधिका:यांनी तळोद्याचे नवनियुक्त प्रांताधिकारी अमोल कांबळे यांची नुकतीच भेट घेतली़ या वेळी त्यांच्याशी चर्चा केली़ तळोदा उपविभागातील अक्कलकुवा-तळोदा तालुक्यातील ग्रामीण खेडय़ातील पोलीस पाटलांच्या जवळपास 150 जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत़ या रिक्त जागांमुळे कायदा व सुव्यवस्थेत सातत्याने अडचणी येत असतात़
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील, तळोदा तालुकाध्यक्ष गुलाबसिंग वळवी, उपाध्यक्ष करुणाबाई पावरा, अशोक पाडवी, शिवलाल वसावे, बबन इंद्रजित, मंगल पाडवी, जयसिंग गिरासे, सुनील शिरसाठ, मनोज क्षत्रिय आदी उपस्थित होत़े