आकांक्षित जिल्हाअंतर्गत 150 अंगणवाडी स्मार्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:17 PM2019-11-17T14:17:10+5:302019-11-17T14:17:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षीत जिल्हाअंर्गत विविध उपक्रम राबविले जात असून जिल्ह्यातील 150 अंगणवाडी या स्मार्ट करण्यात येणार ...

150 Anganwadi will be smarted under the aspirational district | आकांक्षित जिल्हाअंतर्गत 150 अंगणवाडी स्मार्ट करणार

आकांक्षित जिल्हाअंतर्गत 150 अंगणवाडी स्मार्ट करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकांक्षीत जिल्हाअंर्गत विविध उपक्रम राबविले जात असून जिल्ह्यातील 150 अंगणवाडी या स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध संस्थाचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.  
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक अनिल सोनवणे, प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, वसुमना पंत, जिल्हा नियोजन अधिकारी रमेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, सीएसआर अंतर्गत तयार करण्यात येणा:या मॉडेल स्कुलबाबत केंद्रप्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. स्मार्ट अंगणवाडी  तयार करण्यासाठी आवश्यक    सुविधा देण्यासाठी 150 अंगणवाड्यांची यादी तात्काळ तयार करण्यात यावी. उत्तम सुविधांचा शाळांना उपयोग होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तेथील विद्युत व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्राच्या आवश्यक दुरुस्तीबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावे. 
या भागातील संस्थात्मक प्रसूतीच्या संख्येत वाढ होण्यासाठी एएनएम आणि आशा कार्यकर्ती यांच्यात जागरूकता येण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत करावे. निधर्ाीत मानके न गाठणा?्या उपकेंद्रांवर विशेष लक्ष देण्यात यावे. बालकांचे आरोग्य आणि पोषणाबाबत पालकांचे समुपदेशन करयात यावे, असे त्यांनी सांगितले. विद्याथ्र्यांना लेखन-वाचन क्षमता ओळखण्यासाठी प्राथमिक शाळेत चाचणी घेण्याचे निर्देश   डॉ.भारुड यांनी दिले. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  
जिल्ह्यात 13 सामाजिक संस्था विविधि विकासात्मक कार्यात प्रशासनाच्या सोबतीने काम करीत आहेत. माझगाव डॉक, भारत पेट्रोलिअम, एचपीएल आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या चार संस्था सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार आहेत. 
 

Web Title: 150 Anganwadi will be smarted under the aspirational district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.