असलीच्या राजेशाही होळीत भरला राजकारणाचा ‘रंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:03 IST2020-03-09T14:03:19+5:302020-03-09T14:03:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात सध्या होळीचा फिवर चढला असून संपुर्ण सातपुडा सांस्कृतिक रंगात बुडाला आहे. या होळी ...

1.5 lakh domestic liquor seized from LCB | असलीच्या राजेशाही होळीत भरला राजकारणाचा ‘रंग’

असलीच्या राजेशाही होळीत भरला राजकारणाचा ‘रंग’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यात सध्या होळीचा फिवर चढला असून संपुर्ण सातपुडा सांस्कृतिक रंगात बुडाला आहे. या होळी उत्सवातील अनोखी होळी म्हणजे दिवसा पेटणारी आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची असली येथील होळी. रविवारी या होळीत धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांनीही सहभाग घेवून होळीत राजकारणाचा ‘रंग’ भरला.
सातपुड्यात गेल्या चार दिवसांपासून होळी उत्सव सुरू झाला आहे. रोज विविध गावात वेळापत्रकानुसार होळी उत्सव साजरा होत आहे. ही होळी रात्री साजरा करण्याची परंपरा आहे. रात्रभर परिसरातील विविध गावातील पथके एकत्र येवून पारंपारिक नृत्य करतात आणि पहाटे होळी पेटवितात. याला अपवाद मात्र आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांची होळी आहे. त्यांच्या असली, ता.धडगाव या गावी गेल्या तीन वर्षांपासून ते मानाची होळी साजरा करतात. विशेष म्हणजे ती दिवसा असते. यावर्षी के.सी. पाडवी यांना राज्यमंत्रीमंडळात आदिवासी विकास मंत्रीपद मिळाल्याने सहाजीकच त्यांच्या या होळीला वेगळा रंग व उत्साहही होता. त्यांच्या निवासस्थाना शेजारीच भव्य मंडप टाकून पाहुण्यांची सुविधा करण्यात आली होती. घरालाही वेगळ्या पद्धतीने सजविण्यात आले होते. होळीसाठी खास करून राजकारणातील कार्यकर्त्यांची गर्दी एरव्हीपेक्षा या वर्षी जास्त होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे बांधकाम सभापती अभिजीत पाटील, राष्टÑवादीचे प्रदेश सचिव सुरेश सोनवणे, लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी, रतन पाडवी यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी वर्गातही आदिवासी विकास विभागाचे अपर सचिव ढोके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, तळोद्याचे प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील विविध खात्याचे अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वत: आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी पारंपारिक होळी नृत्याची वेशभूषा करून लोकांमध्ये आले आणि होळीचा ज्वर चढला. होळी मैदानात परिसरातील हजारो लोक उपस्थित होते. तब्बल दोन तास यावेळी होळी नृत्याचा सांस्कृतिक रंगात परिसर न्हाऊन निघाला होता.
परिसरातील गावांसह धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पथके खास आपापल्या पारंपारिक वेशभूषेत तेथे दाखल झाले होते. त्यामुळे यंदाच्या या होळीत प्रचंड उत्साहाचा रंग होता.
त्यात राजकीय कार्यकर्त्यांनी देखील होळी नृत्याचा ताल व ठेका धरण्याचा प्रयत्न केल्याने राजकारणाचे हे वर्तूळ लक्षवेधी ठरत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पारंपारिक पद्धतीने होळी पेटविण्यात आली.

Web Title: 1.5 lakh domestic liquor seized from LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.