१५ दिवसात एसटीच्या चार आगारांनी कमावले अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:04+5:302021-06-25T04:22:04+5:30

जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न कमावणाऱ्या शहादा आगारानेही १५ दिवसात ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. आगाराने २५० फेऱ्या दैनंदिन सुरू ...

In 15 days, four ST depots earned Rs 2.5 crore | १५ दिवसात एसटीच्या चार आगारांनी कमावले अडीच कोटी

१५ दिवसात एसटीच्या चार आगारांनी कमावले अडीच कोटी

जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न कमावणाऱ्या शहादा आगारानेही १५ दिवसात ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. आगाराने २५० फेऱ्या दैनंदिन सुरू केल्या आहेत. आगाराकडून २२ हजार किलोमीटरचा प्रवास बसेस दैनंदिन केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवापूर आगारातून गेल्या १५ दिवसात ६० लाख रुपयांचे उत्पन्न वसूल झाले आहे. आगारातील बसेस विविध मार्गांवर दैनंदिन १४ हजार किलोमीटरचा प्रवास करत आहेत. येथील बसेसच्या ९०पेक्षा अधिक फेऱ्या होत नसल्याची माहिती आहे.

अक्कलकुवा आगारातून दिवसाला दीड लाख रुपयांचे उत्पन्न कमावले जात असल्याची माहिती देण्यात आली. येथील बसेस दिवसाला २५६ फेऱ्यांमधून ७ हजार किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

जिल्ह्यातील चारही आगारांमधून धावणाऱ्या बसेस ह्या केवळ राज्यातच प्रवास करत आहेत. अद्याप आंतरराज्य प्रवासाला परवानगी मिळालेली नसल्याने उत्पन्न कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव आगाराने नवापूर मार्गाने सुरतकडे बसेस सुरू केल्या होत्या. परंतु सध्या या बसेस बंद आहेत. परिणामी नवापूर आगारातून गुजरात हद्दीपर्यंत प्रवाशांना बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंतरराज्य बससेवेसोबतच विद्यार्थी वाहतूकही बंद असल्याने प्रवासी भाड्यातील उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

Web Title: In 15 days, four ST depots earned Rs 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.