महिला वाहकाचे १४ हजाराचे छापील तिकीट लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:37 IST2020-08-30T12:36:12+5:302020-08-30T12:37:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येथील आगारातील महिला वाहकाच्या पेटीतून १४हजारांचे छापील तिकीट लंपास झाल्याची घटना घडली. लॉकडाऊनच्या काळात ...

महिला वाहकाचे १४ हजाराचे छापील तिकीट लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येथील आगारातील महिला वाहकाच्या पेटीतून १४हजारांचे छापील तिकीट लंपास झाल्याची घटना घडली. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी ड्युटीवर नसतांना हा प्रकार घडला आहे. शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
वाहक स्मिता अभिजीत रायसिंग यांची सर्व्हीस पेटी आगारातील इश्यू रूममध्ये ठेवली होती. मार्च महिन्यापासून ड्युटी नसल्याने त्या घरीच होत्या. या काळात अर्थात २१ मार्च ते २५ आॅगस्ट या दरम्यान त्यांची लोखंडी पेटी इश्यू रूममधून लेडीज रुममध्ये नेत त्यातील एस.टी.चे प्रवासी छापील तिकीटे कुणीतरी काढून घेतले. साधारणत: १४ हजार ३२१ रुपयांची ही तिकीटे आहेत. स्मिता रायसिंग या पाच महिन्यानंतर ड्युटीवर आल्यावर त्यांनी आपली पेटी शोधली असता ती लेडीज रुममध्ये आढळली. त्यातील तिकिटे गायब असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली.