14 वर्षीय विद्यार्थिनीचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:00 IST2018-10-13T13:00:39+5:302018-10-13T13:00:43+5:30
खेतियानजीकची घटना : चेहरा केला विद्रुप, गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

14 वर्षीय विद्यार्थिनीचा दगडाने ठेचून खून
खेतिया : खेतियानजीक 14 वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना 11 रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी खेतिया पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेतियापासून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या दुधी फलीया जाहूर येथील योगिता विजय धानका (14) ही विद्यार्थीनी भडगोन येथील शाळेत आठवीत शिकते. दररोज दोन किलोमिटर पायी प्रवास ती करीत असे. 11 रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. सायंकाळी साडेचार वाजता शाळेतून घरी पायी जात असतांना ती बेपत्ता झाली. तिचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. घरच्या लोकांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता तिच्या येण्याजाण्याचा रस्त्यावरील ऊसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आलेला होता.
सकाळी खेतिया आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. खेतिया पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुलीचा चेहराच केवळ दगडाने ठेचून खून करण्यात आलेला आहे. शरिरावर इतर कुठेही जखमा नाहीत. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.राजेश ढोले यांनी दिली.
तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक राधेश्याम चौहान यांनी सांगितले, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयीतांर्पयत पोहचण्यात लवकरच पोलिसांना यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.