131 आश्रम शांळांमध्ये डिजीटल क्लासरूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:39 IST2019-11-12T12:39:04+5:302019-11-12T12:39:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत 131 आदिवासी आश्रमशाळा डिजीटल करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि ...

131 आश्रम शांळांमध्ये डिजीटल क्लासरूम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत 131 आदिवासी आश्रमशाळा डिजीटल करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि एचपीसीएल यांच्यात सामज्यंस करार करण्यात आला.
एचपीसीएल नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी दोन कोटी 27 लाख 71 हजार सीएसआर अंतर्गत सहाय्य करणार आहेत. ज्यामध्ये आदिवासी विभागाच्या सर्व 131 शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम तयार करण्यात येणार आहेत. या क्लासरूममध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड आणि प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात अक्कलकुवा 28, धडगाव 27, तळोदा 11, शहादा 18, नवापूर 27 आणि नंदुरबारमधील 20 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी 18 लाख 11 हजार रुपयांचे सहा सोलार वॉटर हिटर सिस्टिम, एक हॉयस्पीड प्रिंन्टर, इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड व प्रोजेक्टर चार, फोटो कॉपी मशिन एक, आणि पाच संगणक देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे स्वत: नवोदय विद्यालयाचेच माजी विद्यार्थी असून त्यांनी या कारणासाठी विशेष प्रय} केले. जिल्ह्यात आदिवासी भागातील विद्याथ्र्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रय} असून हा करार त्याचाच एक भाग असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. यावेळी एचपीसीएलचे मुख्य क्षेत्रीय प्रबंधक प्रयल जांभुळकर, किशोर घरत, एरिया मॅनेजर अमित राणे, चिफ मिनिस्टर फेलो शुभम सोनार उपस्थित होते.