फरार आरोपीला 12 वर्षानी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:11 IST2019-10-01T12:11:50+5:302019-10-01T12:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2008 साली शहरातून कार चोरी करुन फरार झालेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने तब्बल 12 वर्षानी ...

फरार आरोपीला 12 वर्षानी अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 2008 साली शहरातून कार चोरी करुन फरार झालेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने तब्बल 12 वर्षानी हुडकून काढत ताब्यात घेतले आह़े गुजरात राज्यात नाव बदलून संशयित आरोपी रहात होता़
26 जून 2008 रोजी शहरातील रेल्वेगट जवळील हॉटेल समोर लावलेली हरीष मंगा चौधरी यांच्या मालकीची कार अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली होती़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस कारचा शोध घेत होत़े दरम्यान काही दिवसांनी चोरीला गेलेली गाडी अहमदाबाद शहरातील गीता मंदीर चौकात आढळून आली होती़ याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत होत़े दरम्यान ही कार सनी ऊर्फ वनराज प्रतापसिंग परमार रा़ सुरेंद्रनगर याने चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार त्याचा शोध सुरु केला असता तो तुंडा जि़कच्छ येथे ओळख बदलवून एका कंपनीत चालक पदावर नोकरी करत होता़ तेथून तो सुरेंद्रनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी त्याला ताब्यात घेण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली़
जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये अटक न झालेले व गुन्हा घडल्यापासून फरार असलेले 161 फरार आरोपी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहेत़ विधान सभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आह़े