खेतिया शहरात १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:08+5:302021-07-02T04:21:08+5:30

बडवानी जिल्ह्यातील खेतिया नगरपरिषदेने कोरोना मध्यप्रदेश राज्यात १०० टक्के लसीकरण करणारी पहिली नगरपरिषद असल्याचा मान पटकावला आहे. खेतिया ...

100% vaccination in Khetia city | खेतिया शहरात १०० टक्के लसीकरण

खेतिया शहरात १०० टक्के लसीकरण

बडवानी जिल्ह्यातील खेतिया नगरपरिषदेने कोरोना मध्यप्रदेश राज्यात १०० टक्के लसीकरण करणारी पहिली नगरपरिषद असल्याचा मान पटकावला आहे. खेतिया शहर महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. तसेच खेतिया येथे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक व व्यापाऱ्यांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र लागूनच असलेल्या खेतिया शहरात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याची कामगिरीही नगरपरिषदेने केली आहे. कोरोनापासून या भागातील नागरिकांना वाचविण्याचा उत्तम पर्याय म्हणजे लसीकरण असल्याचे हेरून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. येथील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी अथक प्रयत्न करून शहरात १०० टक्के लसीकरण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला. संपूर्ण लसीकरण झाल्यानंतर खेतिया येथील नागरिकांनी फटाके वाजवून व एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला. बडवानी जिल्ह्याचे कोरोना प्रभारी मंत्री प्रेमसिंह पटेल, खासदार डॉ. सुमेरसिंग सोलंकी, खासदार गजेंद्रसिंग पटेल, जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांनी आनंद व्यक्त करताना ज्यांनी सामूहिक प्रयत्नातून हे यश संपादन केले आणि जिल्ह्याचा मान वाढविला, ते खेतिया शहरातील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, पत्रकार, आरोग्य विभाग, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना श्रेय दिले आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार खेतियाची एकूण लोकसंख्या १४ हजार ९५ आहे. यांपैकी चार हजार ८६ हे १८ वर्षांखालील रहिवासी आहेत. अशा प्रकारे येथे १० हजार नऊ लोकांचे लसीकरण करण्यात येणार होते. २३ जूनपर्यंत येथे १० हजार १३६ लोकांना लस देण्यात आली होती. सर्वेक्षण करताना असे दिसून आले की, खेतिया नगरात १८ वर्षांवरील नऊ हजार ५३२ लोकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित ४७७ लोक असे आहेत की जे कोरोनामुळे प्रभावित झाल्यामुळे किंवा गर्भवती, दाई किंवा पलायन करून गेल्यामुळे त्यांचे लसीकरण करता आले नाही. या सर्वेक्षणात असेही समजले की, १२७ नागरिक महाराष्ट्र किंवा इतर जिल्ह्यांतील रहिवासी होते आणि त्यांनी खेतिया येथे लस घेतली आहे. खेतिया शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने प्रशासनाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Web Title: 100% vaccination in Khetia city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.