शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

तातेड-ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी ...

जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भारुड म्हणाले, कोरोनामुळे देशभरात मोठे संकट उभे असून, त्याविरुद्ध

एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. भारतीय जैन संघ आणि ओसवाल परिवाराने २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन संकटाच्या प्रसंगी प्रशासनाला मौलिक सहकार्य केले आहे. या कुटुंबाचे कार्य नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे.

ऑक्सिजन पातळी ९० ते ९५ दरम्यान असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपयुक्त आहेत. प्रशासनातर्फेदेखील आणखी २८० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार असून, ऑक्सिजन सिलेंडर पोहोचू न शकणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात ते उपलब्ध करून देण्यात येतील.

कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचे असून, जिल्ह्यात १८ वर्षावरील साधारण १२ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्यदेखील आवश्यक

आहे. नागरिकांनी ग्रामीण भागात होणाऱ्या शिबिरात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खासदार डॉ. गावीत म्हणाल्या, भारतीय जैन संघाने जिल्ह्यासाठी चांगले योगदान दिले आहे. कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली मदत जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. केवळ ऑक्सिजनमुळे बरे होऊ शकणाऱ्या दुर्गम भागातील जनतेला या यंत्रांचा उपयोग होणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसोबत देण्यात येणारी रुग्णवाहिकादेखील ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. ओसवाल

कुटुंबियांना त्यांनी जिल्ह्याच्यावतीने धन्यवाद दिले.

गौतम जैन म्हणाले, विमलादेवी यांनी जिल्ह्यासाठी मदत देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर

प्रशासनाशी चर्चा करून २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित यंत्र व रुग्णवाहिका लवकरच प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात येईल. दुर्गम आणि ग्रामीण भागात या यंत्रांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी रघुनाथ गावडे, डॉ. कांतिलाल टाटीया, रमाकांत पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

डॉ. टाटीया यांनी बीजेएसच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार केला. डॉ. राहुल वसावे यांनी यंत्राबाबत माहिती दिली. कार्यमक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महेश सुधळकर, तहसीलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, सुरेश तातेड, विजूभाई तातेड, लोणचंद तातेड, देवेंद्र तातेड आदी उपस्थित होते.