शहाद्यात 100 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:17 IST2019-06-11T12:17:23+5:302019-06-11T12:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्लास्टीकबंदी कारवाई अंतर्गत सोमवारी शहादा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 100 ते 110 किलो ...

शहाद्यात 100 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्लास्टीकबंदी कारवाई अंतर्गत सोमवारी शहादा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 100 ते 110 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच एका व्यापा:याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
राज्यात प्लास्टिक बंदी असताना शहादा शहरात उघडउघड या बंदीचे उल्लंघन होत असल्याने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील काही दुकानांची तपासणी करुन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. पालिकेच्या अधिकारी व कर्मचा:यांच्या पथकाने तपासणी केलेल्या दुकानातून सुमारे 100 ते 110 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच भाजी मार्केट परीसरातील कृष्णा सेल्सचे मालक रवी किसनचंद राजनी यांच्याकडे नॉन ओव्हन प्लास्टीक कॅरीबॅग आढळ्याने पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक निमरूलन पथकातील स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, आस्थापना विभाग प्रमुख चेतन गांगुर्डे, सहाय्यक गोटूलाल तावडे, स्वच्छता विभागातील कर्मचारी शंकर वाघ, आकाश वाघ, रहीम दिलावर, ललीत वाघ, विक्की डोडवे, पंकज डाबरे, नरेंद्र डाबरे आदींनी ही कारवाई केली.