नंदुरबार जिल्ह्यात रविवारी आढळले १० रुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:15 IST2020-07-05T21:15:03+5:302020-07-05T21:15:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा आता द्विशतकाच्या घरात आला आहे. एकुण संख्या १९० पर्यंत पोहचली आहे. ...

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी आढळले १० रुण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा आता द्विशतकाच्या घरात आला आहे. एकुण संख्या १९० पर्यंत पोहचली आहे. याशिवाय मृतांचा आकडा देखील एकने वाढला आहे. तोरखेडा येथील मयत वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने एकुण संख्या नऊ झाली आहे. दरम्यान, अजूनही १२४ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. आकडा १९० पर्यंत पोहचला आहे. रविवारी १० जण आढळून आले आहेत. त्यात एकट्या तोरखेडा गावातील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश आहे. त्यातील एका जणाचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना यापूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते.
७८ वर्षीय वृद्धाला त्रास सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांच्या स्वॅबचा अहवाल आलेला नव्हता. तरीही संशयीत म्हणून त्यांच्यावर कोविडच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वृद्धाचाही स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील मृृतांची संख्या एकुण नऊ झाली आहे.
याशिवाय नंदुरबार शहरातील जिजाऊनगरातील दोन जणांचा देखील कोरोनाग्रस्तांमध्ये समावेश आहे. एकजण जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असून एकजण तळोदा येथील रुग्ण आहे.
तोरखेडा येथे आधीपासूनच सर्व ती दक्षता घेतली जात आहे. गावात प्रतिबंध क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. संबधीत कुटूंबातील सदस्य आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
याशिवाय नंदुरबारातील जिजाऊ नगरातील दोनजण आढळल्याने या भागात देखील प्रतिबंधीत क्षेत्र करून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.