कुंभार समाज हितासाठी 10 ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:47 IST2019-11-04T13:47:07+5:302019-11-04T13:47:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव समारंभ, निराधार गरजू महिलांना साडी वाटप व ...

कुंभार समाज हितासाठी 10 ठराव मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव समारंभ, निराधार गरजू महिलांना साडी वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवारी येथे झाला. या कार्यक्रमात कुंभार समाजाच्या हितासाठी 10 ठराव मंजूर करण्यात आले.
प्रकाशा येथील संत दगडूजी महाराज निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गुजरात कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष गजानन खानझोडे, रमाकांत क्षिरसागर, बबनराव जगदाळे, सोमनाथ सोनवणे, किशोर कुंभार, कैलास जगदाळे, रतिलाल कुंभार, सुभाष पंडित, चंद्रशेखर कापडे, रमेश सोनवणे, गोकूळ कुंभार, डॉ.विजय पगारे आदी उपस्थित होते.
या वेळी समाजातील विविध परीक्षा व स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविणा:या 60 विद्याथ्र्याचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संजय गाते म्हणाले की, समाजातील विद्याथ्र्यानी व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करावा. कुंभार व्यावसायात येणा:या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समाज संघटन महत्त्वाचे आहे. समाजातील वीट व्यावसायिकांना 500 ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ असताना काही ठिकाणी मात्र अधिका:यांकडून अडवणूक होते. ते यापढे खपवून घेतले जाणार नाही. 500 ब्रासवरुन एक हजार ब्रासर्पयत रॉयल्टी माझ करून अवकाळी पावसामुळे ज्या वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणीही गाते यांनी केली.
या कार्यक्रमात कुंभार समाजाच्या हितासाठी 10 ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. त्यात रोटी-बेटी व्यवहार सुरू करणे, लगAात हुंडा, बस्ता, मोठे साखरपुडे, नारळ लावणे, आहेर साडी बंद करावी. लगAपत्रिका घरोघरी न जाता पोस्ट किंवा व्हाटस्अपद्वारे पाठविणे, लगAात मान्यवरांचा सत्कार टाळावा, लगA लागण्याआधी संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांचे प्रतिमा पूजन करावे, लगAाचा बस्ता वधू-वर पक्षाने स्वतंत्र करावा, पारावर पूजनासाठी फक्त पेढे व पाणी न्यावे. लगA वेळेवर लावण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळावे, कुंभार समाजाची कार्यकारिणीची मुदत तीन वर्षाची निश्चित करण्यात आली. मद्यपान व धुम्रपान करणा:यांना कार्यक्रमाचे आमंत्रण मिळणार नाही आदी ठराव मंजूर करण्यात आले.