जिल्ह्यातील १० डॉक्टरांना मालेगाव जाण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:36 IST2020-05-12T12:36:01+5:302020-05-12T12:36:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनासाठी मनुष्यबळाची गरज असताना जिल्ह्यात अ दर्जाचे १० वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे पाठवण्याचा ...

जिल्ह्यातील १० डॉक्टरांना मालेगाव जाण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनासाठी मनुष्यबळाची गरज असताना जिल्ह्यात अ दर्जाचे १० वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे पाठवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ या निर्णयामुळे आरोग्य विभागात चर्चा सुरु झाली असून १० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मालेगावी जाण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आहे़
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना आरोग्य उपसंचालक यांच्याकडून पत्र प्राप्त झाले होते़ त्यानुसार त्यांनी शनिवारी १० जणांची नावे अंतिम करुन त्यांना मालेगाव येथे जाण्याचे पत्र दिले आहे़ यात डॉ़ संजीव सुरेश वळवी, डॉ़ प्रिती जयसिंग पटले, डॉ़ श्रीराम शामराव आडभाई, डॉ़ दिनेश शिवाजी रावताळे, डॉ़ सुरेश छगन देसाई, डॉ़ प्रविण लकडू चौरे, डॉ़ गणेश गोरोबा मैदाड, डॉ़ भिमसिंग विकला पावरा, डॉ़ राकेश झुंझार पावरा व डॉ़ शितलकुमार राम पाडवी यांचा समावेश आहे़ शासनाकडून लहान मुले असलेल्या महिला डॉक्टरांना मूळ आस्थापनेच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याची सूट देण्याबाबत सूचित करण्यात आले असताना यात एका महिला डॉक्टरचा समावेश करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आधीच अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे़ सध्या हे सर्व वैद्यकीय अधिकारी जिल्हा आणि तालुकास्तरावर कोविड कक्ष किंवा क्वारंटाईन कक्षात सेवा देत आहेत़
दरम्यान सर्व वैद्यकीय अधिकाºयांना रविवारीच कार्यमुक्त करण्याचे आदेश काढून त्यांना तातडीने मालेगाव येथे रवाना होण्याचे आदेश देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आले आहेत़