नवापूर पालिकेला १० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:28+5:302021-05-16T04:29:28+5:30
नवापूर पालिकेच्या विविध विकास कामांसाठी आमदार शिरीष नाईक यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीकडून सहा कोटी ४१ लाख, वैशिष्ट्यपूर्ण ...

नवापूर पालिकेला १० कोटींचा निधी
नवापूर पालिकेच्या विविध विकास कामांसाठी आमदार शिरीष नाईक यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीकडून सहा कोटी ४१ लाख, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत (ठोक अनुदान म्हणून) दीड कोटी, आदिवासी उपयोजना अंतर्गत २०२०-२१ या योजनेतून एक कोटी ८१ लाख ५८ हजार ७१० रुपये असे एकूण नऊ कोटी ७२ लाख ५८ हजार ७१० रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून पालिका हद्दीतील न्हाणीघर व मुतारी (फायबरचे) विकत घेणे. मोबाइल शौचालय (फायबरचे) विकत घेणे. पुरुष व महिलांसाठी मुतारीची सोय करणे यासारख्या मंजूर विकास कामे या निधीच्या माध्यमातून केले जातील व विकास कामांना गती देण्यात येईल, असे नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सांगितले. नवापूर पालिकेसाठी आमदार शिरीष नाईक यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, नगरसेवक, नगरसेविका तसेच गट प्रमुखांतर्फे आभार मानण्यात आले.
मतदार संघातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य आहे, यात पालिका अंतर्गत शहरातील विकास कामे झाली पाहिजे. त्यासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ. मंजूर करण्यात आलेल्या निधीतून उत्तमरित्या कामे व्हावीत, नागरिकांना दिलेली आश्वासन पूर्ण झाली पाहिजेत.
-शिरीष नाईक, आमदार, नवापूर