प्रश्नमंजुषा स्पर्धेत ७८ विद्यार्थी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:40 IST2020-03-06T11:40:44+5:302020-03-06T11:40:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमात २८ शाळांमधील ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकुण पाच संघ तयार ...

प्रश्नमंजुषा स्पर्धेत ७८ विद्यार्थी सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमात २८ शाळांमधील ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकुण पाच संघ तयार करण्यात आले होते.
नंदुरबार येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुस्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सहायक गट विकास अधिकारी दिनेश वळवी, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी एस. एन. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाव्दारे मुलांचा बौध्दिक विकास, विज्ञान विषयाची गोडी व जिज्ञासा यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम लाभदायक असल्याचे प्रतिपादन डॉ. राहुल चौधरी यांनी केले.
उद्घाटन सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्नाची चिठ्ठी स्वरुपात देऊन मान्यवरांनी नाविन्यपूर्ण पध्दतीने केले. कार्यक्रमात नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नगर पालिका शाळा , शासकीय आश्रम शाळा असे एकुण २८ शाळांमधील एकुण ७८ विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात एकुण पाच संघ करण्यात आले होते. त्यांत डॉ. सी व्ही.रमण संघ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संघ , डॉ. होमी भाभा संघ , डॉ. हरगोविदसिंग खोराणा संघ, डॉ. आचार्य प्रफुलचंद्र रे संघाचा समावेश होता.
मुल्यामापन समितीमध्ये कोठली केंद्र प्रमुख एस.एम.पाटील, धानोरा केंद्र प्रमुख उदय बोरसे ,पिंपळोद केंद्र प्रमुख एच .व्ही. वाघ, बलदेव वसईकर ,दिपक खैरनार , काशिनाथ पवार, सपना हिरे , पुष्पाजंली पाडवी होते.
कार्यक्रमास पोद्दार इटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मुकुंद इंगळे व प्रशासन अधिकारी शरद जाधव यांचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना व संघाला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.