शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; नांदेडच्या भूमिपुत्राची ग्लोबल महाराष्ट्र संकल्पना

By शिवराज बिचेवार | Updated: May 23, 2024 09:54 IST

विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे.  

नांदेड : परदेशात जाऊन शिक्षण घेणे, नोकरी मिळविणे, हे गोरगरिबांच्या स्वप्नातही येत नाही. कारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमतरता. नेमक्या याच बाबी हेरून नांदेडच्या भूमिपुत्राने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जगभरातील संधी उपलब्ध करून देण्याचा ‘ग्लोबल महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू केला आहे. विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे.  

डॉ. सुयश चव्हाण हे दिल्लीत विदेश मंत्रालयात आहेत. त्यांनी चार वर्षे जर्मनीमध्ये काम केले आहे. तेथील कामाच्या अनुभवावरून त्यांना जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी जगाची कवाडे उघडी करण्याची कल्पना सुचली. ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत निवडलेल्या शाळांमधील ७, ८ आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठरावीक दिवशी प्रोजेक्टर, टीव्ही किंवा मोबाइलवर गावखेड्यातून जगभरात गेलेले मराठी तरुण मार्गदर्शन करणार आहेत.  विविध अडचणींवर या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

विद्यावेतनाचीही सोय जर्मनीला दरवर्षी किमान चार ते पाच लाख परदेशी लोकांची गरज असते. तसेच त्या ठिकाणी शिक्षण मोफत आहे. भारतात बारावी पास अन् जर्मन भाषा येत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आयटीआयला प्रवेश घेतल्यास त्यांना विद्यावेतन दिले जाते. आयटीआय झाल्यानंतर लगेच त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरीही मिळते. 

या भाषेत रोजगाराच्या संधी अधिक  - जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी अधिक असून, शिकण्यासाठी जर्मन ही इतर भाषांपेक्षा सोपी आहे. जर्मन अन् मराठी भाषेचे व्याकरण जवळपास सारखेच आहे. जर्मन शिकल्यानंतर रोजगार अन् पुढील शिक्षणासाठी जर्मनीसारख्या देशात जाण्याचे गावखेड्यातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. - परदेशात नोकरी करून मिळविलेला पैसा पुन्हा गावातच येऊन त्यामुळे गावाच्या विकासालाही हातभार लागणार आहे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे डाॅ. चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी