शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:23 IST

शहरानजीक असलेल्या तामसा तांडा येथील अवैध दारुविक्री विरोधात पोलिसांनी छापा मारुन तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर २५ वर्षीय दारु विक्रेत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दोन तासांपासून सदर युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.

ठळक मुद्देकारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : शहरानजीक असलेल्या तामसा तांडा येथील अवैध दारुविक्री विरोधात पोलिसांनी छापा मारुन तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर २५ वर्षीय दारु विक्रेत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दोन तासांपासून सदर युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.तामसा शहराच्या वॉर्ड क्र. ६ मधील तामसा तांडा प्रसिद्ध आहे. या तांड्यात २५ ते ३० घरांची वस्ती आहे. येथीलच लहू लक्ष्मण आडे हा २५ वर्षीय तरुण शहरातून देशी दारु आणून त्याची अवैधरित्या या तांड्यावर विक्री करतो. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलिसांनी या तांड्यावर छापा मारला. यावेळी लहू आडे हा दारु विक्रेता येथे आढळून आला. पोलीस आणि लहू आडे यांच्यामध्ये वाद होवून त्याचे पर्यावसान बाचाबाचीत झाले. आडे पोलिसांशी बाचाबाची करु लागल्याने संतापलेल्या पोलीस पथकाने त्यास बेदम मारहाण केली. यावेळी तांड्यावरील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारहाणीनंतर अपमान सहन न झाल्याने लहू आडे यांनी विषारी औषध प्राशन केले. याची माहिती मिळताच जवळच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती हदगाव शहरात समजल्यानंतर नागरिकांसह मयत लहू आडे याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेवून तेथे ठाण मांडले. सदर तरुणास मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी या जमावाची मागणी आहे. या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांसह नागरिकही पोलीस ठाणे परिसरात थांबून होते. पोलिसांकडून मध्यस्थी करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मयत आडे यास आईवडील, भाऊ, एक मुलगी असून त्याची पत्नी गरोदर आहे.इतके दिवस दारुविक्री बिनबोभाट होती सुरूतामसा शहरानजीकच्या या तांड्यावर मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू होती़ मग आताच पोलिसांनी कारवाई करत दारू विक्रेत्यास बेदम मारहाण का केली ? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे़यापूर्वी पोलिसांच्या आशीर्वादानेच हा अवैध व्यवसाय सुरू तर नव्हता ना आणि केवळ चिरीमिरी देण्यातून तरूणाला मारहाण तर झाली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कारवाईची मागणी होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस