शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

कर्ज परतफेडीच्या तगाद्याने युवकाची आत्महत्या; माजी आमदार पुत्रासह ९ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:22 IST

Crime News Nanded : ययाती मुंडे यांनी अनेक जणांकडून जवळपास ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते.

ठळक मुद्देकर्जाची आणि व्याजाची परतफेड ते करु शकले नाहीतसंपत्ती विकूनही व्याज देणे झाले नाहीमाजी आमदार पोकर्णा यांच्या पुत्रासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड : पैशाच्या परतफेडीसाठी तगादा सुरू असल्याने युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी माजी आमदार पोकर्णा यांच्या पुत्रासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ( Crime against 9 persons including former MLA Omprakash Pokarna's son )

ययाती प्रभाकर मुंडे असे मयताचे नाव आहे. त्यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. परंतु वेळेवर त्याची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे देणेकऱ्यांनी पैसे परतफेडीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्याला कंटाळून ययाती यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात ज्योती मुंडे यांच्या तक्रारीवरून गुरुमितसिंग टुटेजा, करमजितसिंघ बेदी, करमजितसिंघ कारला, किशनजितसिंघ, प्रेमजितसिंघ टेलर, जितेंद्र सूरनर, माधव कदम, संजय जोगदंड आणि प्रवीण ओमप्रकाश पोकर्णा यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. ययाती मुंडे यांनी अनेक जणांकडून जवळपास ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते. परंतू या कर्जाची आणि व्याजाची परतफेड ते करु शकले नाहीत. या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या व्यवहाराची तपासणी करण्यात येत आहे. 

संपत्ती विकूनही व्याज देणे झाले नाहीययाती मुंडे यांच्यावर नऊ लोकांचे तब्बल ६५ लाख रुपये देणे होते. या रक्कमेपोटी त्यांनी श्रीनगरमधील दोन दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील हॉल विकून कर्जफेड केली होती. परंतू त्यानंतरही कर्ज आणि व्याजाची रक्कम देणे त्यांच्याने झाले नाही. त्यामुळे देणेकऱ्यांनी पैशासाठी तगादा लावला होता. अशी चिठ्ठी मुंडे यांनी लिहून ठेवली होती.त्यात करमजीतसिंग बेदी ६ लाख, किशनसिंग ८ लाख, करमजीतसिंग कालरा ७ लाख, प्रेमजीतसिंग टेलर ८ लाख, संजय जोगदंड ८ लाख, जितेंद्र सुरनर ३ लाख, माधव कदम ८ लाख आणि प्रवीण ओमप्रकाश पोकर्णा यांचे साडे दहा लाख रुपये देणे असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले हाेते.

दोन वर्षापूर्वी काढले होते कर्जययाती मुंडे यांची पत्नी ज्योती मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी कर्ज घेतल्याचे नमूद आहे. घटनेच्या दिवशी चहा घेतल्यानंतर जप करतो म्हणून ते खोलीत गेले हाेते. सकाळी साडे दहा वाजता दार ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर सासू आल्या, त्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यावर समोर ययाती यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू