गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:19 IST2021-02-16T04:19:22+5:302021-02-16T04:19:22+5:30

तरुणाला मारहाण करून डोके फोडले नांदेड : जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करीत डोके फोडण्यात आले. या प्रकरणात ...

Young woman commits suicide by strangulation | गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

तरुणाला मारहाण करून डोके फोडले

नांदेड : जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करीत डोके फोडण्यात आले. या प्रकरणात मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सांगवी येथे शिवाजी मस्कले हे घरासमोर थांबलेले असताना आरोपीने जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण करीत डोके फोडले. या प्रकरणात मस्कले यांनी ठाण्यात तक्रार दिली.

संत सेवालाल महाराज जयंती साजरी

नांदेड : पोलीस अधीक्षक कार्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोनि द्वारकादास चिखलीकर, सपोनि शिवाजी लष्करे, बालाजी बंडे, संतोष शेगडे, सपोउपनि उत्तम वाघमारे, पोहेकॉ सूर्यभान कागणे, रेखा इंगळे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

नांदेड : जिल्ह्यात उमरी आणि देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या. गोपाल शंकर भूसलवाड यांनी दुचाकी (क्र. एम.एच.२६, एजे. ९४२२) व्यंकटेशनगर येथील घरासमोर उभी केली होती. ३० हजार रुपयांची ही दुचाकी लंपास करण्यात आली, तर देगलूर येथे सय्यद असदुल्लाह यांची दुचाकी (क्र.एम.एच.२६, बीटी ६४४२) चोरट्याने लांबविली. या प्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मिरवणूक प्रकरणात गुन्हा दाखल

नांदेड : हदगाव शहरातील टी-पॉइंट भागात विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या मिरवणुकीमध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली होती. त्यात कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यात आले. या प्रकरणात शंकर पांढरे यांनी ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Young woman commits suicide by strangulation