तरुणाच्या डोक्यावर कत्तीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:02+5:302021-05-16T04:17:02+5:30
व्यापाऱ्याच्या हातातील पैसे हिसकाविले लोहा शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर एका व्यापाऱ्याला अडवून त्यांच्या हातातील पाच हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून ...

तरुणाच्या डोक्यावर कत्तीने वार
व्यापाऱ्याच्या हातातील पैसे हिसकाविले
लोहा शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर एका व्यापाऱ्याला अडवून त्यांच्या हातातील पाच हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. ही घटना १४ मे रोजी घडली. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सयाजी विठ्ठलराव डोईजड यांना कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत २० रुपयांचा धनादेश मिळाला होता. हा धनादेश त्यांनी लोहा येथील बँकेत जमा केला. त्यानंतर ही रक्कम काढून ते बँकेबाहेर पडले होते. यावेळी आरोपीने त्यांना अडविले. अर्थसाहाय्य योजनेची रक्कम मी मंजूर करून दिली आहे. त्यामुळे मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे डोईजड यांना सांगितले. परंतु डोईजड यांनी नकार दिल्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या हातातील पाच हजार रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोउपनि सोनकांबळे हे करीत आहेत.
जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला
जिल्ह्यात भाग्यनगर आणि किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. संतोष गुणाजीराव भोपाळे यांनी बालाजीनगर येथील घरासमोर एम.एच.३८, झेड ९५३४ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. ३० हजार रुपयांची ही दुचाकी लांबविण्यात आली. तर किनवट येथे साईराम हार्डवेअर समोर लावलेली जुम्मा खान अब्दुल्ला खान यांची एम.एच.२६, बीजी २२९५ या क्रमांकाची दुचाकी लांबविण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मजुराला मारहाण
देगलूर तालुक्यातील मौजे भूतन हिप्परगा येथे दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या एका मजुरावर हल्ला करण्यात आला. ही घटना १३ मे रोजी घडली. दत्ता मारोती सूर्यवंशी हे शेतात थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी दोघांचे भांडण का सोडविले म्हणून सूर्यवंशी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दारूची बाटली दगडावर फोडून ती सूर्यवंशी यांच्या बरगडीत खुपसली. या प्रकरणात सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.