कोरोना अन् म्युकरमायकोसिसला लढा देत तब्बल २८ दिवसांनी तरुण सुखरूप घरी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:43+5:302021-05-31T04:14:43+5:30

दरम्यान, ॲड. शिवाजीराव जाधव यांनी अधिष्ठाता डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधून तरुणावर विशेष लक्ष देण्याची विनंती केली. अधिष्ठाता ...

The young man returned home safely after 28 days of battling corona and mucorrhoea | कोरोना अन् म्युकरमायकोसिसला लढा देत तब्बल २८ दिवसांनी तरुण सुखरूप घरी परतला

कोरोना अन् म्युकरमायकोसिसला लढा देत तब्बल २८ दिवसांनी तरुण सुखरूप घरी परतला

दरम्यान, ॲड. शिवाजीराव जाधव यांनी अधिष्ठाता डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधून तरुणावर विशेष लक्ष देण्याची विनंती केली. अधिष्ठाता डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. विजय कापसे, डाॅ. किरण नांदेडकर, डॉ. मनीषा बोलके, डॉ. प्रशांत गजभारे, डॉ. संजीव झांगडे, डॉ. संज्योत गिरी, डॉ. अतीश गुजराती, डॉ. कपिल मोरे, डॉ. शीतल राठोड, डॉ. उबिद खान, निवासी डॉ. सिद्धेश्वर, स्वरूपा राजेंद्र, सायली, अक्षय, सूर्यकांत, यश यांच्यासह सर्व परिचारिका, नर्स माधुरी घुले यांनी विशेष परिश्रम घेत गजाननचे प्राण वाचविले. दरम्यान, शनिवारी गजाननला रुग्णालयातून सुट्टी दिली असताना डॉक्टरांचे हात जोडून आभार मानताना तरुणासह त्याच्या आई, काका, भाऊ, बहीण, भाऊजी यांचे डोळे पाणावले होते.

Web Title: The young man returned home safely after 28 days of battling corona and mucorrhoea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.