विषारी द्रव्य प्राशन करून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:31+5:302021-04-20T04:18:31+5:30
एकास मारहाण करून जखमी नांदेड : ‘तू आमचे काम का ऐकत नाही’ असे म्हणत ईश्वरसिंह सोनुसिंह परमार (वय २६)या ...

विषारी द्रव्य प्राशन करून तरुणाची आत्महत्या
एकास मारहाण करून जखमी
नांदेड : ‘तू आमचे काम का ऐकत नाही’ असे म्हणत ईश्वरसिंह सोनुसिंह परमार (वय २६)या युवकाला आरोपींनी मारहाण करून गंभीर जखमी केले. भावालाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ईश्वरसिंह परमार यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.
घरासमोरील बकरे, शेळीची चोरी
नांदेड- बाबू रामा राठोड (रा. कृष्णूर) यांच्या घरासमोरीला टिनपत्राच्या शेडमधील तीन बकरे व एक शेळी चोरट्यांनी १७ एप्रिलला चोरून नेली आहे. बकरे आणि शेळीच्या ओरडण्याच्या आवाज आल्याने बाबू राठोड जागे झाले. बाहेर येवून बघितले असता पांढऱ्या रंगाच्या पिकअपमध्ये बकरे व शेळीला आरोपी घेऊन जाताना दिसले. त्यांच्या माहितीनुसार कुंटूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
चौफाळा भागात विनापरवाना मटका
नांदेड- चौफाळा भागातील मालटेकडी येथे एका चिकन सेंटरमध्ये जुगारीवर कारवाई करून विमानतळ पोलिसांनी २२६० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केल्याची घटना १६ एप्रिलला दुपारी २.१५ वाजता घडली. मालटेकडी भागातील गुरुद्वारा ते शंकरराव चव्हाण चौक जाणाऱ्या रस्त्यावर सलमान कुरेशी यांच्या चिकन सेंटरमध्ये मटका जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी कारवाई करून २२६० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी ११८य२१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.