भाडे देण्यावरून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:04+5:302021-05-16T04:17:04+5:30

शहरातील भगवान नगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचे डोके फोडण्यात आले. ही घटना १३ मे रोजी घडली. प्रमोद ...

Young man beaten for paying rent | भाडे देण्यावरून युवकाला मारहाण

भाडे देण्यावरून युवकाला मारहाण

शहरातील भगवान नगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचे डोके फोडण्यात आले. ही घटना १३ मे रोजी घडली. प्रमोद साहेबराव गायकवाड हा तरुण रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भगवाननगर येथे थांबलेला असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रमोद गायकवाडला लाकडाने मारहाण केली. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वृद्ध मजुराने घेतला गळफास

मौजे असदवन येथे एका वृद्ध मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ मे रोजी घडली. विठ्ठल बाबूराव तेलंगे असे मयताचे नाव आहे. १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी घरात पंख्याच्या कडीला गळफास घेतला. या प्रकरणात अजय तेलंगे यांच्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नायगाव ते नरसी जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ११ मे रोजी हा अपघात झाला होता. या प्रकरणात नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रशांत साहेबराव हुलगुलवाड हा तरुण ११ मे राेजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नायगांव ते नरसी रस्त्यावरून जात होता. यावेळी ट्रक क्रमांक जीजे. १२, बीएक्स ८१६४ ने हुलगुलवाड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गोदावरी हुलगुलवाड यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Young man beaten for paying rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.