यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:27+5:302021-06-01T04:14:27+5:30
- शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात... १. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले ...

यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के
- शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...
१. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. कारण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांचे करिअर लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात आले आहे. शाळास्तरावर निकाल तयार करण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे काम वाढले आहे. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने घेतली पाहिजे. - प्रा. धाराशिव शिराळे, शिक्षणतज्ज्ञ, नांदेड
२. कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम केले होते; मात्र त्यांच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचे नाही. त्यामुळे पालकांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले होते. अखेर शासनाने योग्य निर्णय घेतला. - एन. जी. कवडे, पालक
३. दहावीचे संपूर्ण वर्षच आमच्यासाठी खूप कठीण गेले. कारण गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले हाेते. त्यामुळे दहावीचे नियमित वर्ग होऊ शकले नाहीत. ऑनलाईन शिक्षणामुळे आमचे समाधान झाले नाही आणि आता परीक्षेच्या काळातच कोरोनाचे संकट पुन्हा आले, त्यामुळे खूप भीती होती. मात्र आता सर्वकाही ठरल्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत. - राकेश जाधव, विद्यार्थी.
चौकट- असे आहे निकालाचे सूत्र
- विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीअंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकासाठी २० गुण, नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेस अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
चौकट- पुढील प्रवेशाचे काय होणार
दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनानंतर अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्याआधारे विविध शाखेतील प्रवेश निश्चित होतील. ज्या ठिकाणी जागा शिल्लक राहतील, त्या ठिकाणी सरळ प्रवेश मिळेल.