जागतिक पर्यावरण दिनी मनपा, वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे वृक्ष वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:31+5:302021-06-06T04:14:31+5:30
या वृक्षलागवडीचा शुभारंभ महापौर मोहिनीताई येवनकर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मा. आयुक्त डॉ. सुनील लहाने, ...

जागतिक पर्यावरण दिनी मनपा, वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे वृक्ष वाटप
या वृक्षलागवडीचा शुभारंभ महापौर मोहिनीताई येवनकर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मा. आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर खान मसूद अहमद खान, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती संगीताताई पाटील-डक, उपसभापती गीतांजली हटकर, मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार, नगरसेवक नागनाथ गड्डम, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्लाह बेग, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, जहागीरदार वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कैलाश अमिलकंठवार, सचिन जोड, प्रीतम भराडिया, गणेश साखरे, प्रल्हाद घोरबांड, अतुल डोणगावकर, प्रदीप मोरलवार, अनंत कुलकरनी आदींची उपस्थिती होती.
शहरातील विविध भागांत मनपा व वृक्षमित्र परिवाराच्या वतीने वृक्षप्रेमींकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात आला होता. त्या सर्व वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या २०० नागरिकांना भाग्यनगर कमानीजवळ व मनपा मुख्य इमारतीच्या आवारात सदस्य किशोर स्वामी, आनंद चव्हाण, जयश्री पावडे, अमितसिंग तेहरा, सतीश देशमुख यांच्या हस्ते रोप मोफत भेट देण्यात आले. या रोपांचे पालकत्व स्वीकारुन संवर्धनाची जबाबदारी वृक्षप्रेमींनी पार पाडावी, अशी शपथ घेण्यात आली. कोरोनाच्या सुरक्षा नियमावलीचे बंधन पाळून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.