शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची कोटीच्या कोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:13 IST

महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बचत गटांनी केली ९६ कोटींच्या अंतर्गत कर्जाची उलाढाल

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांची ही चळवळ जोम धरत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १८१ गावांमध्ये या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू असून या बचत गटांशी तब्बल २७ हजारांहून अधीधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित आणल्यानंतर या महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास ‘मविम’च्या वतीने सुरूवात करण्यात आली. त्यातूनच या चळवळीने आर्थिकदृष्ट्या असे गोंडस बाळसे धरले आहे. गटाच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्यानंतर त्यांना विविध लघुउद्योगांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. त्यानंतर महिलांची आवड, उद्योगाची संधी आणि त्या भागाची निकड आदी बाबी तपासून हे गट उद्योगामध्ये उतरले.याचप्रमाणे महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्धापूर, नायगाव, चैनपूर (ता. देगलूर) येथे कृषीसेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तर २९ गावांमध्ये महिला बचत गटांच्या वतीने पशू खाद्यविक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४० गावांत महिलांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. यात सुमारे १२०० महिला कार्यरत असून त्यांच्याकडे ३० ते १०० पशुधन आहे. शेळीपालनामध्येही महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास २१०० महिला शेळीपालन व्यवसायामध्ये आहेत.माविमच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे ७५० महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यातील बहुतांश महिलांनी स्थानिक पातळीवर व्यवसायाला सुरूवात केली आहे. या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याचे काम या महिला जोमाने करीत आहेत. याबरोबरच विविध गावांतील महिलांना गुरांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५ गावांत सध्या या महिला पशुसखी म्हणून कार्यरत आहेत. यासर्व लघू उद्योगामुळे शहराबरोबच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील या बचत गटांच्या महिलांनी आजवर १२ कोटी ९ लाखांची एकूण बचत केली आहे.

1 अनेकदा महिलांना अचानक पैशाची गरज पडते. त्यावेळी हेच बचतगट या महिलांसाठी धावून जात असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढ्या रकमेची अंतर्गत उलाढाल केली आहे़2 विशेष म्हणजे, बचत गटाच्या व्याजदराप्रमाणे अवघ्या २ टक्क्यांत गरजूंना कर्ज उपलब्ध होत असल्याने संकटकाळी हे गट महिलांना मोठा दिलासा देणारे ठरत आहेत.3 पिंपळगाव परिसरात असलेल्या सुमारे २० बचत गटांना तर वार्षिक एक ते दीड लाख व्याज मिळू लागले असल्याने या गटांनी आता बँकेला आम्हाला कर्ज नको म्हणून सांगण्यास सुरूवात केली आहे.परतफेडीचे प्रमाण ९९ टक्केकर्ज वसुली हा बँकिंग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा कर्ज वसुली होत नसल्याने कर्जदार संकटात येतोच. याचबरोबर थकित कर्जामुळे पतसंस्था बँकांनाही टाळे ठोकण्याची वेळ आल्याचे दिसून येते. मात्र, महिला बचत गटांना वितरीत केलेले कर्ज हमखास वसूल होते असेच या बचत गटांच्या व्यवहाराकडे पाहिले असता निदर्शनास येते. बचत गटांनी तब्बल ४५ कोटींहून अधिकची कर्जे घेतली असली तरीही या कर्जाची परतफेड ही तितक्याच प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बचत गटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण हे ९९ टक्के आहे.महिला बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत असून त्या कुटुंबासाठी आधार ठरत आहेत. ही चळवळ जिल्ह्यात अधिक गतिमान व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचत गटांना कृषी अवजारे मिळावीत, गारमेंट सेंटरला साहित्य द्यावे, मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसाराचे काम मिळावे तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान या गटांच्या माध्यमातून राबवावे आदी प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास ही चळवळ आणखी बळकट होईल. - चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ.