शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२४० रणरागिणी नांदेड महापालिकेच्या आखाड्यात; पत्नीच्या विजयासाठी 'पतीराजांची' कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:35 IST

कौटुंबिक जबाबदारी पेलत नांदेडच्या महिला उतरल्या राजकीय आखाड्यात.

नांदेड : महापालिका निवडणुकीत २० प्रभागांत पक्षीय आणि अपक्ष अशा एकूण २४० महिला रिंगणात उतरल्या आहेत. सर्वसाधारण गटातूनही अनेक महिलांनी आपली दावेदारी केली आहे. अर्धांगिनीला निवडून आणण्यासाठी पतीराजांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी आरक्षण महिलेला सुटल्यामुळे माजी नगरसेवकांना आपल्या पत्नीला पुढे करावे लागले होते. त्यामुळे पत्नीच्या विजयासाठी पतीराजांकडून चांगलाच जोर लावला जात आहे. प्रभाग आरक्षण आणि जागा वाटपाच्या सूत्रामुळे अनेक माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. 

पतीच्या कामाच्या जोरावर अनेक महिला रिंगणातही उतरल्या आहेत. तर अपक्ष किंवा इतर पक्षांकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महापालिकेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येकच प्रभागात महिलांना संधी मिळाली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळतच या महिला निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावताना दिसत आहेत. २४० महिलांपैकी किती जणी सभागृहात पोहोचतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मी तुमची लाडकी बहीणराज्यात निवडणूक प्रचारात महायुतीतील तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तिन्ही पक्षांचे नेते प्रचारात आपल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे नांदेड शहरात मात्र पक्षीय आणि अपक्ष महिला उमेदवार घरोघरी भेट देऊन पुरुष मतदारांना मी तुमचीच बहीण आहे, असे समजून आशीर्वाद मागत आहेत.

कोणत्या प्रभागात किती महिलाप्रभाग क्रमांक १- १८, २ - १४, ३ - १५, ४ - १०, ५ - १६, ६ - १३, ७ - ७, ८ - ८, ९ - १०, १० - ८, ११ - ७, १२ - १३, १३ - १३, १४ - १४, १५ - १२, १६ - १६, १७ - ५, १८ - १२, १९ - १५ आणि प्रभाग क्रमांक २० मध्ये १६ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 240 Women Contest Nanded Municipal Elections; Husbands Campaign Vigorously

Web Summary : Nanded's municipal election sees 240 women candidates. With reserved seats, husbands are actively campaigning for their wives. Women candidates are seeking blessings, branding themselves as sisters to male voters. 50% reservation gives women opportunity. Outcome awaited.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका