‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:58+5:302021-02-23T04:26:58+5:30

क्लस्टर पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा (तिसरे व चौथे सत्र) या ८ ते १५ मार्च ...

Winter 2020 examination schedule announced under 'Swaratim' University | ‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

क्लस्टर पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा (तिसरे व चौथे सत्र) या ८ ते १५ मार्च दरम्यान होणार आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या २३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहेत. चार वर्षीय व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा (तिसरे, चौथे, पाचवे व सहावे सत्र) या ०८ ते १५ मार्च दरम्यान होणार आहेत. पाच वर्षीय व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा (तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे व आठवे सत्र) या १६ ते २७ मार्च दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम बीसीए,बीसीएस व इतर व्यवसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या ०१ ते १० एप्रिल दरम्यान होणार आहेत. सर्व अभियांत्रिकी, विधी, बी.एड, एम.एड, एम.बी.ए, एम.पी.एड. व औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या १० ते २० एप्रिल दरम्यान होणार आहेत.

विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा (पाचवे व सहावे सत्र) या १६ ते २७ मार्च दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (तिसरे व चौथे सत्र) बीसीए, बीसीएस, फार्मसी, विधी, अभियांत्रिकी अभ्यासक्रम अंतिम वर्ष तीन वर्षीय अभ्यासक्रमाचे (पाचवे व सहावे सत्र) चार वर्षीय अभ्यासक्रमाचे (सातवे व आठवे सत्र) तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे (नववे व दहावे सत्र) या परीक्षा २२ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहेत. एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ०१ ते ०७ एप्रिल दरम्यान होणार आहेत.व्यवसायिक सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमास हिवाळी २०२० परीक्षेसाठी प्रात्यक्षिक परीक्षा लागू असल्यास अशा अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

Web Title: Winter 2020 examination schedule announced under 'Swaratim' University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.