शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून मीच टार्गेट का ? कार्यक्रमात गोंधळानंतर अशोक चव्हाण म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 19:00 IST

मी आणि माझाच मतदारसंघ टार्गेट का ? असा सवाल आमदार अशोक चव्हाण यांनी केला.

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) :  विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत असताना मराठा आंदोलकांनी घोषणा देत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. मात्र, या प्रकारामुळे व्यथित झालेल्या आ. चव्हाण मी आणि माझाच मतदारसंघ टार्गेट का ? असा सवाल केला. तसेच आपण एकाच विचाराचे आहोत, आपल्या पोरांनी याचा विचार करावा. आरक्षण मिळालंच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले. 

अर्धापूर तालुक्यातील, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा विजयादशमीच्या मुहूर्तावर २०२३-२४ गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी भास्करराव खतगावकर, आ.मोहन हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, सभापती संजय देशमुख लहानकर यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे बोलत असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. "एक मराठा, लाख मराठा", साहेब मराठा समाजाच्या सन्मानार्थ राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक आणि भूमिका स्पष्ट आहे, लपून छपून नाही, असे म्हणत चव्हाण यांनी मुखेड, लोहा, कंधार सोडून माझा मतदारसंघ आणि मीच टार्गेट का ? असा सवाल केला. 

केंद्राने कायदा करून आरक्षण द्यावे आपल्या पोरांनी विचार करावा. आपण एकाच विचाराचे आहोत,  हे मराठा समाजाच्या आपल्या पोरांनी समजून घेतले पाहिजे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय नसून केंद्राचा विषय आहे.  जर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसच्या धरतीवर संसदेत कायदा करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 

वाढदिवस साजरा करणार नाहीमराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्या. त्यावेदना भावना दुःख आम्हा सर्वांना आहेत. यामुळे मी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. कोणीही वाढदिवसाला हार - तुरे, गुच्छ- पुष्प आणू नये, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड