शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकानाला आग; १६ लाखांच्या कॅन्डी-बिस्कीटांची राख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:27 IST

आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले, तसेच शेजारील घरानां देखील आगीचा मोठा फटका बसला आहे

उमरी (नांदेड): शहरातील हरीओम कन्फेक्शनरी या होलसेल खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानाला आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जवळपास १६ लाखांचे खाद्यपदार्थ, फर्निचर व २० हजाराची रोकडची राख झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

शहरातील बालाजी मंदिर परिसरात बालाजी कोरनलेलू यांचे हरी ओम कन्फेक्शनरी नावाने बिस्किट्स आणि कॅन्डी विक्रीचे होलसेल दुकान आहे.  आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागला. शेजाऱ्यांनी पाहणी केली असता दुकानात आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलास दिली. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकान कवेत घेतले. होलसेल दुकान असल्याने आत बिस्कीट आणि कॅन्डीचा मोठ्या प्रमाणावर माल होता. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारील घरांची हानी टळली. आगीत संपूर्ण माल, फर्निचर रोख २० हजार जाळल्याची माहिती आहे. 

शॉर्टसर्किटमुळे आग, शेजाऱ्यांना मोठी झळदुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. दरम्यान, याच दुकानाच्या समोर कापडाचे गोदाम आहे. तसेच आजूबाजूला रहिवासी घरे आहेत. आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने दुकानासमोर पार्क दुचाकींना आग लागली. मात्र, वेळीच नागरिकांनी पाणी टाकल्याने दुचाकी सुरक्षित राहिल्या. शेजारच्या घरावरील पाण्याच्या टाक्या, घरांचे विजेचे मीटर,  वायर आदी  साहित्य मात्र जळून खाक झाले. आगीचे माहिती मिळताच शहरातील अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडfireआग