कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 09:38 AM2021-11-02T09:38:59+5:302021-11-02T09:43:06+5:30

Deglur by election result: काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे . तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला.

Who will be the MLA? Counting of votes begins for Deglaur Assembly by-election | कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू

कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू

googlenewsNext

नांदेड - जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या (devour by election result )  पोटनिवडणूकीची आज मतमोजणी होणार आहे . संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणूकित कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे .

आज सकाळी 8 वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे . 14 टेबलवर  ही मोजणी 30 फेऱ्याची होईल . या निवडणुकीत 64.95 %   इतकं मतदान झालं .. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं . एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत . मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली .वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून आहे.

काँग्रेस कडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव  जितेश अंतापूरकर तर भाजपाकडुन माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात लढत आहेत . ही निवडणूक काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्यासाठी   प्रतिष्ठेची आहे . तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला ..

Web Title: Who will be the MLA? Counting of votes begins for Deglaur Assembly by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.