कुजबूजसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST2021-08-19T04:23:27+5:302021-08-19T04:23:27+5:30

नांदेड शहरात काही अधिकाऱ्यांनी आराेग्य उत्तम राहावे म्हणून सायकल चालविण्यावर जाेर दिला. त्यासाठी सायकलींची जुळवाजुळव केली गेली; परंतु एका ...

For whispers | कुजबूजसाठी

कुजबूजसाठी

नांदेड शहरात काही अधिकाऱ्यांनी आराेग्य उत्तम राहावे म्हणून सायकल चालविण्यावर जाेर दिला. त्यासाठी सायकलींची जुळवाजुळव केली गेली; परंतु एका अधिकाऱ्याला चक्क राजकीय नेता तथा लाेकप्रतिनिधीने अत्यंत महागडी सायकलच ‘भेट’ दिली. या सायकलीवर खर्च केल्या गेलेल्या आकड्यांचीच चर्चा हाेऊ लागली आहे. एरव्ही शासकीय यंत्रणा राजकीय मंडळींना खुश करण्यासाठी ‘भेट’ देतात; परंतु येथे जणू गंगा उलटी वाहिली. राजकीय नेत्याने अधिकाऱ्याला महागडी सायकल भेट दिल्याने शासकीय यंत्रणेतच आश्चर्य व्यक्त केले जाते. यावरून त्या राजकीय नेत्याला खुश करणारी ‘उलाढाल’ व त्यातील ‘मार्जीन’ किती माेठे असावी याचा तर्क लावला जात आहे. याच सायकलीच्या आडाेशाने अशा अनेक उलाढाली बिनबाेभाटपणे जिल्ह्यात सुरू आहेत. रियल इस्टेट, भूखंड माफिया व रेती घाटांवर या उलाढालींची उघड चर्चा हाेताना दिसते आहे.

Web Title: For whispers