शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी रंगेहाथ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:41 IST

प्लॉट ग्राम पंचायच्या नमुना नं़ ८ वर नावे करण्यासाठी मागितली लाच

ठळक मुद्देग्रामविकास अधिकाऱ्याच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचण्यात आला़

नांदेड : गावठाणमधील असलेला प्लॉट ग्राम पंचायच्या नमुना नं़ ८ वर नावे करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नांदेड तालुक्यातील रहाटीच्या ग्राम विकास अधिकारी हनमंत मष्णाजी वाडेकर याला रंगेहात पकडण्यात आले आहे़ त्याच्यासह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे़

नांदेड तालुक्यातील राहटी येथे तक्रारदाराच्या राहत्या घराच्या बाजुला गावठाणचा प्लॉट आहे़ तो प्लॉट तक्रारदाराच्या ताब्यात ५० वर्षापासून आहे़ हा प्लॉट तक्रारदारच्या नावे ग्रामपंचायतीच्या नमुना नं़८ वर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर याने दीड लाख रुपये लाच मागितली़ या प्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़

या तक्रारीवरुन ८ सप्टेंबर रोजी ग्रामविकास अधिकारी वाडेकर यांच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचण्यात आला़ वाडेकर याने लाचेचे दीड लाख रुपये खाजगी इसम बालाजी मरीबा वाघमारे यांच्यामार्फत स्वीकारले या प्रकरणी विमानतळ ठाण्यात ग्रामविकास अधिकारी वाडेकर याच्यासह बालाजी वाघमारे विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे़

ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, कपील शेळके, पो़ना़ एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके, आशा गायकवाड यांनी केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNandedनांदेड