शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

जातीय पर्यावरण कधी सुधारणार? बोंढार गावातून जोगेंद्र कवाडे यांचा संतप्त सवाल

By शिवराज बिचेवार | Published: June 05, 2023 6:04 PM

अक्षय भालेराव खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित कॉंग्रेस आमदार आणि पोलिसांवर कारवाई करावी.

नांदेड- राज्यात सत्ता परिवर्तन होते. परंतु जातीय मानसिकतेत फरक पडत नाही. आज जागतिक पर्यावरण दिन अख्ख्या जगात साजरा होत आहे. परंतु या राज्यातील जातीय पर्यावरण कधी सुधारणार आहे. एनसीआरबीच्या रिपाेर्टमध्ये देशातील अत्याचाराच्या प्रकरणात महाराष्ट्रात यंदा ११ टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या या भूमीत ही विदारक परिस्थिती आहे अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. 

सोमवारी बोंढार येथे मयत अक्षय भालेराव याच्या कुटुंबीयांची कवाडे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कवाडे म्हणाले, अक्षय हा भीमसैनिक धडाडीचा तरुण होता. यंदा पहिल्यांदाच त्याने गावात भीमजयंती काढली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही ठेवला होता. परंतु काही जातीयवादी गुंडांना हे पाहवले गेले नाही. त्यातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पैसा आणि सत्तेची मस्ती यातून असे प्रकार घडत आहेत. परंतु याबाबत काँग्रेसचे स्थानिक नेतेही काही बोलण्यास तयार नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन अशा प्रकारच्या प्रवृत्ती फोफावणार याची काळजी घेण्याची गरज आहे. असेही कवाडे म्हणाले.

काँग्रेस आमदाराने आरोपींना दिला आश्रयकाँग्रेसच्या एका आमदाराने आरोपींना आश्रय दिला. नंतर स्वत:हून त्यांना हजर केले. तसेच काही पोलिस अधिकारीही गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित आमदार आणि पोलिसांवर कारवाई करावी. तसेच मयत भालेरावच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी कवाडे यांनी केली.

दक्षता समितीच नाहीॲट्राॅसिटी कायद्यात तरतूद आहे. राज्यभरात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर निगराणी ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करावी. परंतु अशी समितीच अद्याप स्थापन करण्यात आली नाही. जीवन-मरणाच्या या प्रश्नाकडे सत्ताधारी, पोलिस आणि प्रशासन या सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे कवाडे म्हणाले.

टॅग्स :Jogendra Kawadeप्रा. जोगेंद्र कवाडेNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी