रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST2021-04-29T04:13:47+5:302021-04-29T04:13:47+5:30
चौकट - हे धान्य मिळणार मोफत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३५ किलो गहू व तांदूळ ...

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार ?
चौकट - हे धान्य मिळणार मोफत
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३५ किलो गहू व तांदूळ दिला जाणार आहे. यावेळी तुरीची डाळही देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी कार्डधारकांना मात्र पूर्वीप्रमाणे धान्याची खरेदी करावी लागणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुरवठा विभागाकडून बाजरी व मका देण्यात आली होती. मक्याचा उपयोग खाण्यासाठी होत नसल्यामुळे अनेकांनी त्याचा वापर जनावरांना खाऊ घालण्यासाठी केला. त्यामुळे मका देऊ नये, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चौकट- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
१. शासनाकडून मोफत धान्य दिल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र वाटप लवकर करण्यात यावे. मागील दोन महिन्यांपासून हातांना काम नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- बबन भालेराव, तरोडाखू. नांदेड
२. मागील काही दिवसांपासून मोफत धान्य मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न पडला आहे. बाहेर काम नाही. घरात धान्य नाही, अशा वेळी मोफत धान्याचा आधार मिळेल, असे वाटत आहे.
- तुळशीराम कांबळे, सांगवी.