शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव बोहल्यावर चढताना अचानक प्रेयसी धडकली; बिंग फुटताच वधूच्या नातेवाईकांकडून नवरदेवाची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:27 IST

प्रेयसीच्या धक्कादायक खुलाशाने नववधूचे कुटुंबिय अव्वाक झाले़

ठळक मुद्देप्रेयसीने वराचे माझ्याशी लग्न झाल्याचा केला दावा विवाह मोडताच नात्यातील एका युवकाने लग्नाची तयारी दर्शवली

नांदेड : सनई-चौघड्याच्या सुरात नवरदेवाचे लग्नमंडपात आगमन झाले़ आहेराच्या देवाण-घेवाणीनंतर नवरदेव बोहल्यावर चढणार तोच लग्नमंडपात त्याची प्रेयसी धडकली़ अन् नवरदेवाचे बिंग फुटले़ त्यामुळे संतप्त झालेल्या नववधूच्या नातेवाईकांनी नवरदेवाची यथेच्छ धुलाई करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले़ 

नांदेड शहरातील कौठा भागातील एका मंगल कार्यालयात शनिवारी ११ वा़५१ मिनिटांनी याच भागातील नववधू प्रिया (नाव बदलले) हिचा विवाह कळमनूरी तालुक्यातील दांडेगावच्या अरविंद जगदेवराव साखरे याच्याशी होणार होता़ नववधूकडील मंडळींनी लग्नाची जय्यत तयारी केली होती़ लग्नमांडवात दोन्ही बाजूंची वºहाडी मंडळीही जमली होती़ पाहुण्यांच्या सराबराईत सर्वजण व्यस्त होते़ दोन्हीकडच्या पाहुण्यांना आहेराची देवाण-घेवाण झाली़ थोड्याच वेळात नवरदेव अरविंद हा बोहल्यावर चढणार तोच त्याची प्रेयसी माया (नाव बदलले) ही लग्नमंडपात येवून धडकली़ तीने थेट नववधू प्रियाच्या कुटुंबियांना जावून वर अरविंद आणि माझे यापूर्वीच लग्न झाल्याचे व त्याने आपली फसवणुक केल्याची आपबिती सांगितली. 

मायाच्या या धक्कादायक खुलाशाने नववधू मायाच्या कुटुंबिय अव्वाक झाले़ त्यानंतर नववधूच्या कुटुंबियांनी लगेच याबाबत वर अरविंद व त्याच्या कुटुंबियाला जाब विचारला़ यावेळी अरविंद याने मायाशी यापूर्वी प्रेमप्रकरणात होतो़ परंतु आमचे लग्न झाले नाही़ असे सांगताच नववधूच्या कुटुंबियांनी नवरदेव अरविंदची यथेच्छ धुलाई करण्यास सुरुवात केली़ काही वेळातच ही गोष्ट लग्नमंडप व परिसरात वाऱ्यासारखी पोहचली़ या ठिकाणी अरविंदची प्रेयसी असलेल्या माया हिने अरविंदसोबतच्या प्रेमप्रकरणाचे पुरावे दिले़. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़. फसवणुक करणारा नवरदेव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ 

नववधूचा दुसऱ्या युवकाशी विवाहदरम्यान, नियोजित वर अरविंद याच्याकडून फसवणुक झाल्यानंतर नववधूचे कुटुंबिय काळजीत पडले होते़ नववधूचे पित्याचे छत्र हरविले असून आईनेच शेती विकून तिच्या लग्नाची तयारी केली होती़ त्यामुळे आता नववधूचे कसे? या विवंचनेत सर्व जण होते़ तोच नववधूच्या नातेवाईकापैकीच एका मुलाने प्रिया हिच्याशी लग्नास होकार दिला़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजता प्रियाचा त्या मुलाशी विवाह लावून देण्यात आला़ हा विवाह जुळावा यासाठी परिसरातील अनेकांनी प्रयत्न केले़ 

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडPoliceपोलिस