व्हीलचेअरच्या बॅटरी केल्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:29+5:302021-06-27T04:13:29+5:30

निळा शिवारातून दुचाकी लंपास तालुक्यातील निळा शिवारात घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास करण्यात आली. नागोराव दत्ता सूर्यवंशी यांनी हिरो ...

Wheelchair-powered lamps | व्हीलचेअरच्या बॅटरी केल्या लंपास

व्हीलचेअरच्या बॅटरी केल्या लंपास

निळा शिवारातून दुचाकी लंपास

तालुक्यातील निळा शिवारात घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास करण्यात आली. नागोराव दत्ता सूर्यवंशी यांनी हिरो होंडा कंपनीची दुचाकी घरासमोर उभी केली होती. या प्रकरणात लिंबगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नंदीग्राम सोसायटीत मोबाईल चोरीला

नंदीग्राम सोसायटीत अभिषेक राजू खंदारे हा विद्यार्थी दरवाजा उघडा ठेवून घरात झोपला होता. या वेळी चोरट्याने आत प्रवेश करून सॅमसंग कंपनीचा १५ हजारांचा मोबाईल लांबविला. झोपेतून जाग आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.

बसमध्ये चढताना सोन्याची पोत लंपास

हदगाव येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेची १२ हजार रुपयांची सोन्याची पोत लंपास करण्यात आली. ही घटना २५ जून रोजी घडली.

जिजाबाई अर्जुन वाढवे ही महिला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांची नजर चुकवून सोन्याची पोत उडविली. या प्रकरणात हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Wheelchair-powered lamps