सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल : डॉ. प्रतिभा अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:55+5:302021-04-16T04:16:55+5:30

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य ...

The wheel of revolution will turn only with the strength of social unity: Dr. Pratibha Ahire | सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल : डॉ. प्रतिभा अहिरे

सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल : डॉ. प्रतिभा अहिरे

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, अशोक खनाडे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, भय्यासाहेब गोडबोले, साऊल झोटे, सज्जन बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रतिभा म्हणाल्या, इथल्या आंबेडकरी चळवळींना निष्प्रभ करण्याचे कारस्थानी काम सातत्याने सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, नेते आणि बुद्धिजिवींची बुद्धीच भ्रमिष्ट करण्याचा आराखडा आखला गेला आहे. सामाजिक आणि मानसिक गुलामीतच संपूर्ण भारतीय समाज कसा राहील यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. क्रांतीचा रथ जोमाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते स्वार्थांध झाले आहेत. बाबासाहेबांनी फिरविलेले क्रांतीचे चक्र उलट्या दिशेने फिरत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आज, शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रख्यात विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.

चौकट...

चळवळीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा

बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रिया अग्रभागी होत्या. समतेच्या आणि समानतेच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना सर्वच बाबतीत बरोबरीने ठेवायला हवे होते; पण तसे झाले नाही. आंबेडकरी समाजातही आजच्या परिस्थितीत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचे आणि तिच्यावर अधिक अन्याय करण्याचे प्रकार सुरू आहेत. धम्मक्रांतीनंतरच्या इतक्या कालखंडानंतर आपण स्त्रीला समानतेची वागणूक देऊ शकलो नाही. तिच्याबाबातचा दृष्टिकोन बदलू शकलो नाही. स्त्रियांना माणूसपण बहाल केल्याशिवाय सर्वांगीण प्रगती होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: The wheel of revolution will turn only with the strength of social unity: Dr. Pratibha Ahire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.