हद्दपारीचा उपयोग काय? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:24 IST2021-09-16T04:24:06+5:302021-09-16T04:24:06+5:30
नांदेड : जिल्ह्यात सातत्याने गुन्हे करणारे अनेक गुन्हेगार आहेत. त्यांच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. अशा आरोपींच्या विरोधात पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव ...

हद्दपारीचा उपयोग काय? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच!
नांदेड : जिल्ह्यात सातत्याने गुन्हे करणारे अनेक गुन्हेगार आहेत. त्यांच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. अशा आरोपींच्या विरोधात पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात येतो. प्रशासनाकडून तो मंजूर केल्यानंतर काही कालावधीसाठी त्यांना जिल्ह्यातून हद्दपारही केले जाते. या काळात त्यांनी जिल्ह्यात पाय ठेवू नये, असा नियम आहे.
परंतु प्रत्यक्षात हद्दपार झालेले अनेक जण सर्रासपणे आपल्या घरी येऊन राहतात. शहरात राहून पुन्हा ते गुन्हे करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास पोलिसांना वेळ नसतो. अनेक वेळा संबंधित त्याकडे दुर्लक्ष करतात.
जिल्ह्यात मागील दीड वर्षाच्या काळात मोक्कातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणात अनेक जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. आता विक्की चव्हाण आणि कैलास बिगानिया टोळीतील आरोपींवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
n पोलिसांकडून सण-उत्सव किंवा इतर वेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कुणाला ठाण्याच्या, तालुक्याच्या, जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. ही हद्दपारी एक दिवसापासून ते काही महिन्यांपर्यंत असते. या काळात ते पुन्हा गावात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा असते. परंतु सर्रासपणे हे लोक हद्दपारी धुडकावत फिरतात.