शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनासाठी गेला अन् मृत्यूशी गाठ पडली! माहूरच्या वझरा धबधब्यात बुडून तरुणाचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:37 IST

सावधान! धबधब्यावर जाताना काळजी घ्या; माहूरमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू, मित्रांच्यासमोरच गेले प्राण

- नितेश बनसोडेमाहूर (नांदेड): धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना माहूर येथील प्रसिद्ध शेख फरीद बाबा दर्गा परिसरात घडली आहे. शेख इर्शाद शेख रफिक (वय ३२, रा. गोकुंदा, ता. किनवट) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे किनवट आणि माहूर परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमका काय घडला प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार, इर्शाद हा आपल्या काही मित्रांसोबत माहूर येथील शेख फरीद बाबा वझरा येथे दर्शनासाठी आला होता. दर्गा परिसरात दर्शन आटोपल्यानंतर तो जवळच असलेल्या धबधब्यावर पाणी आणण्यासाठी गेला. मात्र, पाय घसरल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट धबधब्याच्या खोल पाण्यात कोसळला. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

मित्रांच्या डोळ्यांदेखत गेले प्राणइर्शाद पाण्यात पडताच त्याच्या मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत त्याला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. काही वेळातच त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. ऐन उमेदीच्या वयात इर्शादचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत अद्याप माहूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrim Drowns at Waterfall Near Shrine; Tragedy Strikes Mahur

Web Summary : A 32-year-old man drowned at the Wazra waterfall near the Sheikh Farid Baba Dargah in Mahur while visiting the shrine with friends. He slipped while fetching water and couldn't be saved, despite immediate rescue efforts. The incident raises concerns about tourist safety.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी